Breaking News
Loading...

Monday, 11 September 2017

महिला पोलिसाच्या मुलाचा खून

पिंपरी :-निगडी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदाराच्या मुलाचा एका टोळक्याने काठीने मारहाण करून खून केला.  एमआयडीसी भोसरी हद्दीतील एका रुग्णालयात जखमी अवस्थेत टाकून मारेकरी पसार झाले. हा प्रकार आज सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास समोर आला..

अजिंक्य सुनील जैद ( वय१९, रा. निगडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोहन नगर परिसरातील तरुणांनी अजिंक्य याला तो शिकत असलेल्या प्रतिभा कॉलेज येथून जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यांनतर त्याला काठीने मार दिला..यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अजिंक्य याला सायंकाळी सहाच्या सुमारास भोसरी, एमआयडीसी परिसरातील श्री. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात सोडून मारेकरी पसार झाले. मात्र डॉक्टर तपासणी पूर्वीच अजिंक्यचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मारेकरी फरार असून पोलिस शोध घेत आहेत, खुनाचे कारण अद्याप समजले नाही...

No comments:

Post a Comment