तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करणार इगतपुरीत दहा दिवस ध्यानधारणा !

_________________________

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येथील इगतपुरी येथील शिबीरा मध्ये दहा दिवसांचे ध्यानधारणा करणार आहेत. यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात आज संध्याकाळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याआधी सुद्धा अनेक ठिकाणी असलेल्या विपश्यना केंद्रात जाऊन धान्यधारणा शिबीर मध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नाशिक मधील इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात पहिल्यांदाच आले आहेत. याठिकाणी असलेल्या निसर्गरम्य परीसरात ते जवळपास 10 दिवस ध्यानसाधना करणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विमानाने मुंबई आले. त्यानंतर मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत इगतपुरी येथे संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास दाखल झाले. येथील धम्मगिरीच्या वतीने व्यवस्थापक सावलाजी यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, नगर सेवक नईम खान, रिपाइंचे सुनील रोकडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment