Breaking News
Loading...

Saturday, 16 September 2017

सावरकरांचा राष्ट्रवाद : वक्तृत्व स्पर्धा उत्साहात


परभणी : प्रतिनिधी
वीर सावरकर विचारमंच परभणीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन शनिवारी १६ रोजी
सकाळी १० वा. प्रसिद्ध विधिज्ञ अ­ॅड.रामेश्वर सोमाणी यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व विचारमंचाचे संचालक अभय चाटे, मेघनाताई बोर्डीकर, रमेशराव गोळेगावकर, नितीन वट्टमवार, संजय रिझवाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती. ही स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन विद्याथ्र्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.
जिल्ह्यात वीर सावरकर मंचाची स्थापना नुकतीच झाली असून सावरकरांचा राष्ट्रवाद या विषयावर शनिवारी शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतीक सभागृहात ही स्पर्धा संपन्न झाली. यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य कनिष्ठ महाविद्यालयीन विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी डॉ.अनील कांबळे, प्रल्हादराव कान्हडे, राजकुमार भांबरे, डॉ.नविनचंद्र मोरे, विजय अग्रवाल, प्रवीण भाणेगावकर, श्री मुंढे, विनोद डावरे, दिनकर देशपांडे आदी विचारमंचाच्या संचालक व कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचा निकाल रविवारी घोषीत होणार असून विजेत्यांना 'अंदमानची सहल' हे बक्षीस देण्यात येणार आहे. बक्षीस वितरण चाणक्यमंडल पुणेचे संचालक तथा माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस प्राप्त तीन्ही स्पर्धकांना अंदमानची सहल घडवून आणण्याचा संकल्प वीर सावरकर मंचाच्या वतीने पूर्वीच करण्यात आलेला आहे. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून बीड येथील डॉ.बाहेगव्हाणकर,परळी येथील प्रा.नयनकुमार आचार्य,व अंबड येथील प्रा. डॉ.अमीत राऊत,या तज्ञ परीक्षकांनी परीक्षणाचे काम केले.

No comments:

Post a Comment