तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 8 September 2017

हो, मी शिवसेनेमध्ये नाराज, मंत्र्यांकडून कामे होत नाहीत - शिवसेना आमदाराने दिला घरचा आहेर.


_________________________

चेंबूर अणुशक्ती नगर येथील शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. शिवसेना आज राज्यात, केंद्रात आणि महापालिकेत सत्ते मध्ये आहे. पण सत्तेत राहूनही कामे होत नसतील तर, निश्चितच दु:ख होते अशा शब्दात तुकाराम काते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनेच्या मंत्र्यांकडून कामे होत नाहीत. मीआज शिवसेने मध्ये नाराज आहे अशी स्पष्ट कबुलीच त्यांनी दिली. मी पक्षावर नाराज असलो तरी, शिवसेना सोडणार नाही असे त्यांनी सांगितले. मी भाजपा मध्ये जाणार असल्याच्या वावडया उठवल्या जात आहेत. पण मी शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही. नारायण राणेंनी मला संपवण्याची धमकी दिली तेव्हाही मी शिवसेना सोडली नव्हती. सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कठिण काळात मला मदत केली. त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेशाची ऑफर दिली होती. पद देण्याचा शब्द दिला होता पण त्यावेळी सुद्धा मी शिवसेना सोडली नाही असे तुकाराम काते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment