तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

बुधवारी मृगशिरा नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. अमृत आणि सिद्धी योग जुळून येत असल्यामुळे नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांचे नवीन सौदे होतील. लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या बाबतील दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष - संकुचित मनोवृत्तीस आवर घालून आज मनासारख्या घटनांचा दिवस सत्कारणी लावा. प्रयत्नांना दैवाची साथ नक्कीच मिळेल. शब्द जपून वापरा. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-५.

वृषभ - आज इच्छापूर्तीचा दिवस असून हितशत्रूंवर सहजपणे मात करू शकाल. विद्यार्थ्यांना प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. गृहीणींना कामाचा उरक राहील. शुभ रंग : हिरवा, अंक-४.

मिथुन - ज्येष्ठ मंडळींनी घरातील तरुणांच्याही अडचणी समजून घेणे गरजेचेे आहे. महिलांना आज परिश्रमांतून यशप्राप्ती. विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील रहावे. शुभ रंग : नारिंगी, अंक-१.

कर्क - विवाह विषयक बोलणी यशस्वी होतील. समोरची व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. प्रामाणिक मेहनत व सकारात्मकतेने अशक्य कामेही शक्य होतील. शुभ रंग : िहरवा, अंक-९.

सिंह - नोकरदारांचे अिधकार वाढतील. व्यावसाियकांना अपेक्षेपेक्षा जास्तच नफा होईल. मित्र चुकिचा मार्ग दाखवतील. सरकारी नियम पाळा. शुभ रंग:भगवा, अंक-३.

कन्या - विविध मार्गांनी आर्थिक उन्नत्ती होणार आहे. व्यवसायात मोठया उलाढाली वेग घेतील. प्रियजनांच्या गाठीभेटीत तुमचा वेळ आनंदात जाईल. शुभ रंग : मोतिया, अंक-३.

तूळ -मानपान दुखावणारी एखादी घटना घडू शकते. आज तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेऊनच आपला स्वार्थ साधून घ्या. वास्तवाचे भान गरजेचे. शुभ रंग : पिवळा, अंक-७.

वृश्चिक -काही नवे हितसंबंध जुळून येतील. उद्योग व्यवसायातील अनुकूलते वातावरणामुळे मनाचे नैराश्य दूर होईल. कुटुंबियांच्या भावनांचा आदर कराल. शुभ रंग : केशरी, अंक-९.

धनू -बेरोजगारांना रोजगाराच्या संधी चालून येतील. महिलांचे गृहोद्योग तेजीत चालतील. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारुच नका. आज प्रयत्नांती यश. शुभ रंग : राखाडी, अंक-७.

मकर -कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. चैनीस लगाम घालावा लागेल. हितशत्रू नमते घेतील. विद्यार्थी अभ्यासा व्यतिरीक्त इतर कलागुणांना प्राधान्य देतील. शुभ रंग :स्ट्रॉबेरी, अंक-२

कुंभ -अधिकारी वर्गास बढतीच्या बातम्या येतील. समाजिक कार्य करत असाल तर मानपान बाजूला ठेवा. ज्येष्ठ मंडळींना सत्संग फायदेशीर राहील. शुभ रंग : पांढरा, अंक-६.

मीन - व्यावसायिक कामानिमित्त प्रवास कार्यसाधक होतील. लेखक, कवीवर्य यांच्या लिखाणाचे रसिकांकडून कौतुक होईल. गृहीणींना माहेरची ओढ लागेल. शुभ रंग : मोरपंखी, अंक-८.

No comments:

Post a Comment