तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

माखणी ते फुलकळस (ता. पुर्णा) रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी माखणी ग्रामस्थांचे आमरण उपोषण, लेखी आश्वासना नतंर स्थगीत. सहा दिवसात रस्ता दुरुस्त करण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन.

ताडकळस : प्रतिनिधी गोविद मठपती
(दि.०६) पुर्णा तालुक्यातील माखणी ते फुलकळस रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या परिसरात झालेल्या पहिल्याच पावसात रस्त्यावर सर्वत्र चिखल व खड्डेच खड्डे झाले आहेत. या भागतील नागरीकांनी वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करुन ही प्रशासना कडून दुरुस्ती तर झालीच नाही पण दुरसंचार विभागाच्या वतीने केबल  टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील मातीमुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल व खड्डे झाले आहेत त्यामुळे माखणी ते फुलकळस (ता. पुर्णा) रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी येथील गोविंद आवरगंड व सुनिल आवरगंड यांच्या नेतृत्वखाली माखणी ग्रामस्थांचे सिंगणापुर ते ताडकळस रोड वरील पाटी वरच आमरण उपोषण सुरु केले होते. त्यांना पाठीबा देण्यासाठी विद्यार्थ्यासह गावकऱ्यांनी माखणी पाटीवर ठिया मांडला तसेच प्रशासना विरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहेया अत्यंत खराब झालेल्या रस्त्यामुळेयामुळे दुचाकीचे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. सध्या परिसरातील पीके वाढीस लागली आहेत. व फवारणी, कोळपणी इत्यादी मशागतीची कामे सुरु असुनत्यासाठी लागणारी औषधी व खते इत्यादी साहित्य ताडकळस येथील बाजपेठेतून खरेदी केले जाते तसेच विविध बँकांच्या शाखा, शाळा महाविद्यालय व सर्व व्यवाहार ताडकळस येथे असतात परंतु माखणी ते फुलकळस रस्ता खराब झाल्यामुळे जास्तीचे वाहणभाडे देऊनही वाहण चालक या खराब झालेल्या रस्त्यामुळे माल वाहतुक करण्यास तयार होत नाहीत.  तसेच माखणी वरपुड, पांढरी व पोरजवळा इत्यादी गावांना ताडकळस बाजार पेठेसी जोडनार हा परिसरातील महत्वाचा रस्ता आहे.
परिसरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी सायकल वर तर विद्यार्थींनीसाठी मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत बस सुरु असून या अत्यंत खराब झालेलेल्या रस्त्यामुळे हि बस सेवा वारंवार बंद होतआहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून दुचाकी स्वारांना हा रस्ता पार करणे म्हणजे मोठे दिव्यच होऊन बसले आहे. संबंधीत प्रशासकिय अधिकारी या कडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष  करीत असल्यामुळे आज दि.६ संप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्या पासुन आमरण उपोषण ला माखणी येथील गोविंद आवरगंड, सुनिल आवरगंड बसले असुन या आंदोलनाला छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव आवरगंड, फुलकळस चे सरपंच गजानन शिराळे, ताडकळस मराठी पत्रकार संघ, ताडकळस येथील राँ. काँ. युवाकार्यकर्ते त्र्यंबक आबोरे, काँग्रेसचे युवा पदाधिकारी रामप्रसाद आंबोरे, फुलकळचे चेअरमन भगवान सलगर, संतकृपा चालक मालक संघटनेचे नवनाथ आवरगंड, तुकाराम गव्हाळे, आशोक आवरगंड, एकनाथ आवरगंड, खडाळा येथील सरपंच नवनाथ शिंदे, यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा दिला तर शालेय मुलामुलीसह ग्रामस्थानी रोडवर ठिया मांडला होता रस्ता दुरुस्ती होई पर्यंत  हे आंदोलन सुरुच राहील असे आंदेलकांच्या वतीने सांगण्यात येत होते. ताडकळस ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुढाकार घेउन वरिष्ठ अधिकाऱ्यासी संपर्क केला. या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बाधकाम उप विभाग पुर्णाचे उप अभियंता के. एच. सोनावणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलकांना दि. १२/०९/२०१७ रोजी पर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्याचे लेखी दिले. त्यामुळे सदर आंदोलन स्थगीत करण्याची घोषणा आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी माखणी व फुलकळस येथील गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment