Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

राष्ट्रवादीला भगदाड माऊली बाप्ते यांसह युवाकांचा भाजपात प्रवेश

सुभाष मुळे....
----------------
गेवराई, दि. 14 __ शहरातील राष्ट्रवादीच्या शेकडो युवकांनी कार्यसम्राट आ. लक्ष्मणराव पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला.
      गेवराई शहरात यापुर्वी पासूनच आ. अमरसिंह पंडित यांना माणनारा मतदार नाही. पंडित - पवार यांच्यामध्ये राजकीय दरी निर्माण झाली तेव्हा पासून आ. अमरसिंह पंडित यांनी शहरावर लक्ष केंद्रीत केले होते. तेव्हा पासून त्यांनी शहरातील युवकांना हाताशी धरून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. अनेक युवकांचा भ्रमनिरास झालेल्या या गेवराईतील शेकडो युवकांनी कार्यसम्राट आ. लक्ष्मणराव पवार यांच्या विकासाला साथ देण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने बुधवार, दि.13 सप्टेंबर रोजी रात्री शहरातील आनंद बाप्ते यांचे चिरंजीव माऊली बाप्ते यांनी आपल्या असंख्य युवकांना सोबत घेऊन आ. लक्ष्मणराव पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला आहे
       यावेळी नगराध्यक्ष सुशील जवजाळ, सभापती राहुल खडागळे, जानमंहमद बागवान, संजय इंगळे, भरत गायकवाड, अजित कानगुडे, शाहरूख राज आदि उपस्थित होते. यावेळी ऋषी पंडित, अक्षय नागरे, केशव सोलाट, शुभम येवले, महेश कादे, दत्ता बाप्ते आदिसह शेकडो युवकांनी पवार यांच्या  उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment