तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

पुनर्वसित गांवाना विकासाठी निधी द्या युवासेना

संपत रोडगे गंगापुर प्रतिनिधी

सोमवारी दिनांक ११ रोजी जिल्हा अधीकारी कार्यालयऔरंगाबाद येथे जिल्हा       अधिकारी यांना भेटून असे निवेदन करण्यात आले की नेवासा तालुक्यामध्ये ७/७/१७ रोजी पुनर्वसित गावांच्या विकासासाठी शासनाने चार कोटी ८१ लाख रुपये मंजूर केले परंतु गंगापूरमध्ये पुनर्वसित गावांसाठी एक रुपया देखील मंजूर झाला नाही म्हणून जिल्हाधिकारी यांना पुनर्वसित गावांना विकासनिधी मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले.युवा सेना जिल्हा अधिकारी मा संतोष माने पा यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले प्रसंगी जि प सदस्य दिलीप निरफळ, युवा सेनेचे तालुका अधिकारी मच्छिंद्र देवकर, मुकुंद जोशी,अमोल माने, अर्जुन कराळे, सुभाष माने आदी उपस्थित होते.

संपत रोडगे 9420486389

No comments:

Post a Comment