Breaking News
Loading...

Sunday, 17 September 2017

मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमीत्त अशोक जामोदे यांचा सत्कार


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी                        सोनपेठ : येथील तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मा. तहसीलदार जिवराज डापकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल अशोक जामोदे यांचा सत्कार करण्यात आला.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी पोलिस निरीक्षक मा. सदानंद येरेकर, सपोनि बाबुराव जाधव, पोलिस उपनिरीक्षक  यांनी मानवंदना दिली. यावेळी सोनपेठ तालुक्यातील विविध घटकातील मान्यवर अधिकारी कर्मचारी  पत्रकार शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते. सोनपेठ तहसील कार्यालयाचे कर्मचारी अशोक जामोदे यांनी अनेक वर्षापासून पर्यावरणाची निगा राखण्यासाठी तहसील आवारात लावलेल्या वृक्षाचे जतन करून त्यांचे योग्य रीत्या संगोपन केले त्याबद्दल पत्रकार संघातर्फे अशोक जामोदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रगीत व देशभक्ती पर गीत कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय व महालिंगेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यीनींनी सादर केले.
यावेळी सुत्रसंचालन प्रा. महालिंग मेहत्रे यांनी तर आभार सय्यद इसा यांनी मानले यावेळी तालुक्यातील नागरीक व अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment