तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 6 September 2017

नामस्मरणात सर्व साधनांची फलनिष्पती – पंढरीनाथ महाराज पगार


शांताराम मगर
वैजापुर:-मानवी जीवनातील दु:ख मुक्तीसाठी भगवंताचे  नामस्मरण महत्वाचे असून सर्वश्रेष्ट शक्ती व सर्व साधनांची फलनिष्पती नामसाधनेत असल्याचे प्रतिपादन संत शिवाई संस्थानचे अध्यक्ष, भागवताचार्य  ह.भ.प पंढरीनाथ महाराज पगार यांनी केले. शिऊर येथील श्री संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिरात गेल्या नऊ महिन्यापासून सुरु असलेल्या श्रीविष्णू सहस्रनाम ग्रंथाचे विवरण व विवेचनाची सांगता झाली यावेळी आयोजित कीर्तनात पंढरीनाथ महाराज बोलत होते.

      “भाग्यवंता हेची काम, मापे नाम वैखरी” या अभंगावर विवेचन करतांना पगार महाराज म्हणाले कि, भौतिकतेच्या अतिरेकाने  झालेले परिणाम जगाला कळत असून आता जगाची रती सत्संगाकडे वाढत आहे. आत्मीयतेने नामस्मरण करणाऱ्यासोबत देव असतो त्यामुळे नामस्मरण करणारा भाग्यवान ठरतो. विष्णूसहस्रनामामुळे जीवनात अध्यामिक ऊर्जा मिळत असल्याचे देखील यावेळी महाराज म्हणाले.

श्री विष्णूसहस्रनाम ग्रंथाच्या सांगतेनिमित्त भगवान श्री विष्णूचे एक हजार तुळशीपत्र अर्पण करून पूजन करण्यात आले.या पूजेत शेकडो भाविक सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment