तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे - डॉ.धनंजय गायकवाड


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथिल रोटरी क्लब व कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ येथे शिक्षक दिवसाचे औचित्य साधून शिक्षक गुण गौरव 2017 व 11 वी च्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लातुर येथील मैत्री फाउंडेशनचे संचालक धनंजय गायकवाड पाटील यांचे करीअर या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मा.आ. व्यंकटराव कदम, ह.शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष परमेश्वररावजी कदम, रोटरी क्लबचे अध्यक्ष बालमुकूंद सारडा, रो.चंद्रकांत लोमटे,  प्राचार्य डाँ.वसंत सातपुते, रो.प्रदीप गायकवाड, गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण साहेब इ. उपस्थित होते.
     रोटरी क्लब सोनपेठ यांच्या वतीने राष्ट्रनिर्माते शिक्षक 2017 गुरूगौरव पुरस्कारचे वितरण या वेळी करण्यात आले. प्रा.डाॅ.संतोष रणखांब (वरपूडकर महा.),  प्रा. गोविंद लहाने(महालिंगेश्वर ऊ.मा.वि.),  शौकत पठाण (गटशिक्षणाधिकारी),  श्री ओमप्रकाश लष्करे (बाजीराव देशमुख विद्यालय), शेख सिकंदर (जि.प.प्रा.शा.हनुमान नगर) व श्रीमती कन्याकुमारी आरावत (बालवाडी ताई नगरपालिका सोनपेठ) या सहा शिक्षकांना "गुरूगौरव 2017 पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले. यानंतर  करीयर विषयक  मार्गदर्शन करताना कुठल्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी ज्ञान मिळवणे हे आवश्यक आहे. त्यासाठी आपले ध्येय निश्चित करून तशी वाटचाल करणे आवश्यक ठरते. आपल्या ध्येयाकडे जाण्याची जिद्द निर्माण करणे आवश्यक आहे.  असे प्रतिपादन डाॅ.धनंजय गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सखाराम कदम, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांनी तर आभार प्रा. आरती बोबडे यांनी मानले. राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment