Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

समाजवादी पार्टीच्या महानगर अध्यक्षपदी मंसुर खान यांची निवड


परभणी : प्रतिनिधी
    समाजवादी पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष तथा आ.अबु असीम आझमी यांच्या आदेशाने राज्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.
     पक्षाचे कार्य तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने तसेच जन सामान्यांच्या  प्रश्नाना वाचा फोडण्याच्या हेतूने समाजवादी पार्टी सदैव गोर गरीबांच्या सोबत राहीली आहे व गोर गरीबांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र परीश्रम करीत आहे व पुढेही करण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आ.अबु आझमी यांच्या आदेशांना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया करण्यात आल्या.परभणी महानगरअध्यक्ष म्हणून येथील मंसुर खान यांची निवड आ.अबु असीम आझमी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव परवेझ सिद्दीकी, मो.अल्ताफ, अय्युब खान, मोईन खान, राधाकिशन पंडीत, अनिल मोरे, रौफ शेख, शमशोद्दीन अन्सारी, शेख गौस, शे. इसाक बाबुराव सायन्ना आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment