Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

कविता माणसाला जगणे शिकविते अशोक गायकवाड यांचे प्रतिपादन.


शांताराम मगर प्रतिनिधी लोणी खुर्द
तलवाडा न्यू हायस्कूलमध्ये " कवी आपल्या भेटीला "कार्यक्रम संपन्न  
    साहित्याच्या रूपाने निर्माण झालेल्या कवीतेतुन माणसाला जगण्याचे संदर्भ मिळतात .आणि कवीता माणसाला जगणे शिकविते असे मत कवी अशोक गायकवाड यांनी व्यक्त केले .

        तलवाडा ता .वैजापूर येथील न्यू हायस्कूलमध्ये आयोजीत केलेल्या हिंदी भाषा दिनानिमित्त आयोजीत केलेल्या "कवी आपल्या भेटीला "या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक एस .एम .मोरे हे होते तर कवी अशोक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती .गायकवाड पुढे म्हणाले की ,कवितेच्या माध्यमातून अनेक वेदना समोर आलेल्या असतात परंतु त्याच वेदना शमविन्याचे काम कविता करत असतात .कवीता कशा लिहाव्यात या विषयी मुलांना सखोल मार्गदर्शन त्यांनी केले कारण ग्रामीण भागातही दर्जेदार साहित्य निर्मितीची अनेक उदाहरणे आपण पाहतो त्यासाठी विचार मंथन गरजेचे आहे .आपले विचार यमक जुळवून कागदावर उतरवा त्यातून कवितेची निर्मिती होईल .आणि एक दिवस आपल्यातून चांगला कवी तयार झालेला बघायला मिळेल असेही ते म्हणाले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी पवार व दिक्षा मगर यांनी केले तर  अस्मिता मगर हिने आभार मानले . यावेळी प्रशालेचे  एस .एस .खरात ,के .एस .नाडगौडा , जे .व्ही .पवार , एन .पी .पोटे,एन .डब्ल्यू .निकम,आर .डी .जोर्वेकर ,एस .एस .गायकवाड ,कुंडलिक वाळेकर ,बी .के .निकम ,एच .के .सय्यद ,डी .आर .हिरे यासह विद्यार्थी  मोठया संख्येने उपस्थिती होते 

No comments:

Post a Comment