Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

ॲड सुहासीनी त्रेंबकराव साखरे यांचे अपघातात झाले निधन.. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड सिमा साखरे यांच्या त्या कन्या होत..


नागपूर:-जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड सिमा साखरे यांच्या कन्या ॲड सुहासीनी त्रेंबकराव साखरे यांचे अपघातात निधन झाले. सावनेर नागपूर मार्गावरील पिंपळा डाक बंगला येथे उभ्या ट्रकला त्यांच्या नैनो गाडीने धडक दिली. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.

सुहासिनी या ७ वर्षापासुन लंडन येथे वास्तव्यास होत्या. दोन वर्षापुर्वी त्या नागपूरात आल्या होत्या. पुढील महीन्यात त्यांचा कॉलीफोर्निया येथे जाण्याचा मानस होता. त्यासाठी त्यांची तयारी सुध्दा पुर्न झाली होती. काही खाजगी कामासाठी त्यांना सावनेर येथे गेल्या होत्या. गुरुवारी त्या त्यांची नैनो गाडी क्रमांक एम एच ३१ डी व्ही ७१८० ने त्या नागपूर येथे परत येत होत्या. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पिंपळा डाग बंगला जवळ एका पुलावर एक ट्रक नादुरुस्त स्थीतीत उभा होता. सुहासीनी यांचा अंदाज चुकाला आणि त्यांची कार ट्रकच्या मागे जावून आदळली. ही धडक ईतकी भिषण होती की कारचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला. यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुहासीनी यांच्याकडे असलेल्या कागदपत्राच्या आधारावर ओळख पटविण्यात आली...

No comments:

Post a Comment