Breaking News
Loading...

Monday, 11 September 2017

जागतिकीकरण आणि भारत पुस्तकाचे प्रकाशन


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
जालना : येथे संपन्न झालेल्या पहिल्या श्रमिक साहित्य संम्मेलनाच्या समारोप सत्रात डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, डॉ. डी.एल कराड, कॉ. कुमार शिराळकर, अण्णा सांवत यांच्या हस्ते प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे, प्रा.डॉ. राजक्रांती वलसे, प्रा. डॉ. कल्याण गडकर व प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
जागतिकीकरण आणि भारत या ग्रंथात एकुण बाविस लेख असून राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय, ग्रामिण राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य, संस्कृती, भाषा,  विविध कष्टकरी चळवळी, समग्र भारतीय समाज घटकांवरील जागतिकीकरणाचा झालेला परिणाम व होणारा परिणाम या विषयावर लेख आहेत. आजच्या परिस्थितीत अशा विषयाचे पुस्तक हे अनेक विचारांना चालना देणारे आहे,  असे मत श्रमिक साहित्य संम्मेलनातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
या पुस्तक प्रकाशन प्रसंगी प्राचार्य वंदना तिडके व प्रा. डॉ. यशवंत सोनूने यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी अनेक साहित्यिक, मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment