Breaking News
Loading...

Friday, 15 September 2017

गावच्या विकासासाठी होणाऱ्या निवडणुकीत पुढे यावे - पुजा मोरे

सुभाष मुळे...
------------------
गेवराई, दि. 16 __ सत्ताधारी व विरोधी पक्ष या दोन्ही बाजू सक्षम असल्यास खऱ्या अर्थाने लोकशाही नांदू शकते असे मत व्यक्त करुन गावचा विकास करण्यासाठी ग्राम पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून तरुणांनी पुढे आले पाहिजे असे मत गेवराई येथील पंचायत समिती सदस्या पुजा अशोक मोरे यांनी केले.
          ग्राम पंचायतची आचारसंहिता लागू झाली आणि जिल्हाभर निवडणुकीचं वातावरण निर्माण झाले. सध्या देशभरात चाललेल्या पारंपारीक राजकारणाला कुठे तरी वेगळी वाट नवतरूंणानी केली पाहिजे. याकरिता तरूणाईने राजकारणात सक्रिय झाले पाहिजे. यंदा गावचा सरपंच हा जनतेतून निवडला जात असल्याने अनेक जण उमेदवारी घेण्यासाठी उत्सुक असलेलं पहायला मिळतंय.पण सकारात्मक व विकासात्मक बदल घडवायचा असेल तर राजकारणातील सुशिक्षित तरुणांचा टक्का वाढला पाहिजे. त्या करिता येणाऱ्या ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी निवडणुकांच्या आखाड्यात उतरावे असे आवाहन देखिल गेवराई येथील पंचायत समिती सदस्या पुजा अशोक मोरे यांनी केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment