Breaking News
Loading...

Tuesday, 12 September 2017

सोलापुरातील आठ पत्रकारांच्या जीवाला धोका ; गुप्तचर यंत्रनेने पाठवला अहवाल


सोलापूर - जनतेच्या भल्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या अनेक पत्रकारांवर जीवघेने हल्ले झाले आहेत.या हल्ल्यात काही पत्रकारांनी आपला जिव गमवला आहे.वाईट विचार , ढोंगी पणा यांचा बुरखा फाडूंन आधुनिकतेच्या जोरावर वेगळी वाट दाखवणाऱ्यांना नेहमीच विरोध होतो.आशा सोलापूर शहर जिल्ह्यातील आठ पत्रकारांच्या जिवाला धोका आहे.यामध्ये काही संपादक , क्राइम रिपोर्टर आणि इलेक्ट्रॉनिक मध्यमाच्या प्रतिनिधिंचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा हा समवर्ती भाग म्हणून सर्वांना परिचित आहे.महाराष्ट्र आणि कर्णाटक राज्यला जोड़ाणारे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे.सोलापूर शहरात आंध्र भाषिक तेलगु , कन्नड़ भाषिक , आणि इतर भाषिक त्यामध्ये मराठा , हिंदी , गुजरती अशी बहुभाषिक लोक राहतात.सोलापूर शहरात बाहेरील राज्यातील एटीएस पथकाने दाखल होवुन येथील चालणाऱ्या स्लीपर सेल संबंधित लोकांवर देखील कारवाया केल्या आहेत.आशा बहुभाषिक शहरात पत्रकारिता क्षेत्रात काम करने मोठे जिकिरीचे असताना देखील आपल्या वेगळ्या विचार धारेने सामान्यांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न सोलापुरातील पत्रकार मंडळी करत आहेत.वाईट मार्गाने काम करणाऱ्या अनेकांचे बुरखे सोलापुरातील पत्रकारांनी फाडले आहेत.गैर धंदयाला आपले जग बनवलेली अनेक मंडळी पत्रकारांमुळे दुखावली गेलीय.आपल्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झालेल्या अनेक मंडळी पत्रकारांवर नाराज आहे.आशा लोकांपासुन शहर जिल्ह्यातील आठ पत्रकारांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

पत्रकार सौरक्षन कायद्याचा मसूदा तयार करत असताना राज्य शासनाने राज्यातील किती पत्रकारांच्या जिवाला धोका आहे याची अकडेवारी प्रत्येक जिल्ह्यातील शासन यंत्रनेकड़े मागवली होती.यावेळी संबंधित यंत्रनेने शहर जिल्ह्यातील आशा पत्रकारांची माहिती गोळा केली. ज्यामध्ये आठ पत्रकारांचा समावेश आहे.यामध्ये सोलापुरातील नामांकित दैनिकांचे संपादक , एक क्राइम रिपोर्टर आणि एक इलेक्ट्रीक माध्यमाचा प्रतिनिधी यांचा समावेश आहे.या आठ लोकांच्या नावाचा समावेश असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रनेने शासनाला पाठवला आहे..

No comments:

Post a Comment