तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, बीएसएफ जवान शहीद.

_________________________

जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तानने पून्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघनकेलं आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद झाला आहे.शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. शुक्रवारी सकाळी पाकिस्तानकडून आरएस पुरा सेक्टरमधील अरनिया क्षेत्रात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे तर, एक स्थानिक नागरिक जखमी झाला आहे.पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे बृजेंद्र बहादुर सिंह हे शहीद झाले.
यापूर्वी बुधवारी जम्मूतील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान कडून गोळीबार करण्यात आलाहोता. अखनूर मधील ब्राह्मन बेला आणि रायपूर बॉर्डर पोस्टवर पाकने गोळीबार केला होता. या गोळीबारात 2 बीएसएफचे जवान आणि 3 स्थानिक नागरिक जखमी झाले होते.

No comments:

Post a Comment