तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 10 September 2017

शहापूर येथे पाच वर्षांपासून धूर फवारणी नाही


फुलचंद भगत-प्रतिनिधी मंगरुळपीर

मच्छरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

गजानन मोरे यांची धूर फवारणीची मागणी

मंगरुळपीर- शहरालगत असलेल्या शहापूर व नवीन सोनखासमध्ये गेली पाच वर्षापासून ग्रामपंचायतने धूर फवारणी केली नसल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य पुर्णता धोक्यात आले.या भागात तात्काळ धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन मोरे यांनी केली आहे. शहापूर व नवीन सोनखासमध्ये लोकवस्ती दाट असून या भागातील विविध ठिकाणी सांडपाणी वाहून जाण्याकरिता पुरेश्या नाल्याची व्यवस्था नसल्यामुळे हे सांडपाणी ग्रामस्थांच्या घरासमोर साचते. यातून परिसर दुर्गंधीमय झाला तसेच गांजरगवत वाढल्याने मच्छराची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच या परिसरात डुकरांचा संचार वाढला आहे या विविध समस्यांमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे ग्रामपंचायतने तात्काळ दखल घेवून हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

फुलचंद भगत,मंगरुळपीर जि.वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment