तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Friday, 15 September 2017

आता ड्रायव्हिंग लायसन्सही करावं लागणार आधार कार्डसोबत लिंक?

_________________________

आधार कार्डआणि पॅन कार्ड एकमेकांसोबत लिंक केल्यानंतर आता केंद्र सरकारने आणखीन एक योजना आखली आहे. आधार कार्ड सर्वच महत्वाच्या सेवांसोबत जोडण्याचं केंद्र सरकारने निश्चित केलं आहे. त्यानुसार, आधार-पॅन जोडण्यात आलं. मग सिम कार्डसोबत आधार कार्ड लिंक करण्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्स सोबत आधार कार्ड जोडण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सांगितलं की, ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आधार कार्डसोबत जोडण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. यासाठी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली आहे. रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं की, मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी पॅन-आधार लिंक करण्यात आलं. आता ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डसोबत जोडलं तर डुप्लिकेट लायसेन्सवर लगाम लागेल. आधार एक डिजिटल आयडेंटिटी आहे आणि डिजिटल गव्हर्नंस एक चांगलं शासन असतं. अनेकजण डुप्लिकेट लायसन्स जवळ बाळगतात आणि दारु पिऊन गाड्या चालवतात. मात्र, आधार-लायसन्स लिंक झाल्यास अशा कृत्यांनाही आळा बसेल.केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड लिंक करण्याची योजना आखली आहे. यापूर्वी पॅन-आधार आणि सिम कार्ड-आधार लिंक करणं अनिवार्य केलं आहे. जर तुम्ही पॅन कार्ड सोबत आधार लिंक केलं नसेल तर तुम्हाला आयटीआर फाइल करण्यात अडचण येईल.

No comments:

Post a Comment