तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 8 September 2017

पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांनो,तुम्हीं लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ मोडीत काढु शकणार नाही.


वैजापूर तालुका प्रतिनिधी -सुधीर बागुल

        वारंवार पत्रकारांवर हल्ले करून, धमक्या देवून आणि काही पत्रकारांना संपवून पत्रकारीता क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचा काही समाजकंटकांचा प्रयत्न चालु आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न या देशातील पत्रकार कदापिही यशस्वी होवु देणार नाही. एका पत्रकाराला माराल तर शंभर पत्रकार उभे राहतील, शंभर पत्रकारांना माराल तर हजार उभे राहतील आणि हजार पत्रकारांना माराल तर लाख पत्रकार उभे राहतील, परंतु सत्य बाजू निर्भिडपणे मांडणारी पत्रकारीता आम्ही पत्रकार कधीच संपवू देणार नाही. कदाचित तुम्ही (पत्रकारांवर हल्ले करणारे) शक्तीशाली असालही, तुमची डोकी थोडी विचित्रही असेल आणि तुम्ही बंदूकीच्या जोरावर लेखणीला दाबण्याचा वारंवार प्रयत्नही कराल, मात्र तुम्हास एवढंच सांगणं आहे की, तुमच्यात पत्रकारांशी समोरासमोर लढण्याची तयारी नाही, तयारी म्हणण्यापेक्षा तुमची लायकी नाही, कारण तुमची लायकी असती तर तुम्ही विचारांची लढाई विचारांनीच लढला असता.
पत्रकारांमुळेच लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत आहे आणि हाच लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत असल्यामुळे लोकशाही खऱ्या अर्थाने तग धरून आहे, जर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ नसता तर लोकशाहीची काय अवस्था झाली असती याचा थोडासा विचार केला तर बरंच काही लक्षात येईल.
समाज व देशासाठी स्वाभिमानी पत्रकार आपले संपूर्ण जिवण निस्वार्थपणे पणाला लावत असतात, विविध क्षेत्रात जावून स्वतःचं कल्याण करून घेण्याची संधी असतांना, त्या क्षेत्राला बाजूला सारून पत्रकारांनी समाज आणि देशहित लक्षात घेवून पत्रकारीता क्षेत्राला निवडलेले असते, स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देवून पत्रकारीतेचा खडतर प्रवास निवडलेला असतो, गोरगरीब व सर्वसामान्य नागरीकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि स्वाभिमानाने प्रत्येकाला जगता यावे म्हणून पत्रकार आपल्या लेखणीतून वेळोवेळी लिखाण करत असतात.  एखाद्या विषयाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम काय होतील याबद्दल पत्रकार विश्लेषणात्मक लिहीत असतात. फक्त पत्रकारांनाच लिहीण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे असं नाही, प्रत्येक नागरीकाला लिहीण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे, परंतु काही चुकीच्या विचारसरणीची आणि राज्यघटनेला न मानणारी लोकं विचारांची लढाई विचारानेच न लढता पत्रकारांवर हल्ले करून व कट कारस्थान रचून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना हे माहीत नाही की, पत्रकारांचा आवाज जेवढा दाबण्याचा प्रयत्न केला जाईल तेवढाच तो वाढत जाईल.
लक्षात ठेवा, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि देशहितार्थ पत्रकारांनी लेखणी उचलली आहे त्यामुळे पत्रकार शांत आहेत, जर लेखणी सोबत पत्रकारांनी बंदूक उचलली तर तुमचे (हल्ले करणाऱ्यांचे) काय हाल होतील याचा अंदाजही तुम्ही बांधू शकणार नाहीत.

No comments:

Post a Comment