तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 9 September 2017

सात गावात पहिल्यांदाच ग्रामस्थ थेट निवडणार गावचा 'कारभारी'


कार्तिक पाटील
पाथरी:-तालुक्यात सात ग्रामपंचायतीं साठीचे रणशिंग वाजले असून या वेळी पहिल्यांदाच गावचा कारभारी 'सरपंच' थेट जनतेतून निवडला जाणार असल्याची उत्सूकता लागून राहीली असून ७ सप्टेबर रोजी पाथरी तहसिलदारांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.
तालुक्यातील ढालेगाव, खेडूळा आणि लोणी या गावचे सरपंच पद सर्वसाधारण साठी असून मुदगल येथिल सरपंच पद ना म प्रवर्ग महिले साठी राखिव असून जवळा झुटा ना मा प्रवर्गा साठी राखिव आहे तर वडी आणि गोपेगाव सर्वसाधारण महिलां साठी राखिव आहे. या सात गावच्या निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच तहसीलदार शिंदे यांनी जाहिर केला असू १५ ते२२ सप्टेबर या कालावधीत सकाळी ११ते ४:३० या वेळेत ऊमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर २५ सप्टेबर ला सकाळी ११ वा छाननी होणार आहे.२७ सप्टेबर दुपारी ३:०० वाजे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत याच दिवशी तीन नंतर उमेदवारांची अंतीम यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.आवश्यकता असल्यास ७ ऑक्टोबर सकाळी ७:३० ते ५:३० या वेळेत मतदान पार पडणार आहे.९ ऑक्टोबर रोजी मतमोजनी होणार असून ११ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक निकाल प्रसिध्द करतील. या साठी आता प्रस्तापितां विरोधात आघाड्या तयार होत असून गावागावात निवडणूकींच्या गप्पा रंगत असून शेत आखाड्यावर आेल्या पार्ट्या उत्तर रात्री पर्यंत रंगत असून सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या कार्यकर्त्यांना बळ देतात का ? की कार्यकर्ते स्वबळावर या निवडणूका लढवतात या कडे पाहाणे महत्वाचे असनार आहे. सरपंच पदा साठी अनेकजन उत्सूक असून सदस्यां साठी ची चाचपणी गावागावात सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

No comments:

Post a Comment