तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

सेनगांव तालुक्यात वाळु माफीयांना आले अच्छे दिन

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- तालुक्यातील रेती घाटासह इतर तालुक्यातील रेती घाटाहुन रेती माफीयाकडुन अवैध रेती उपसा करुन तीची बांधकामासाठी अव्वाच्या सव्वा रक्कमेत विक्री सेनगावात वाळुची रात्री चाेरटी वाहतुक करण्यासाठी रेती माफीया सक्रीय झाल्याने वाळुमाफीयांना सध्या अच्छे दिन आल्याचे दिसुन येत आहे.
तालुक्यातील बहुतांश रेती घाटाचे लिलाव न झाल्याने त्या रेती घाटातील वाळु वाळुमाफीया रात्र दिवस अवैध रेती उपसा करुन सेनगांव शहरासह ग्रामिण भागात घर बांधकामासाठी वाळुची अवैध मार्गाने विक्री करीत असतांना पहावयास मिळत आहे. माघील महिन्यात उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर यांनी वाळु माफीयाच्या विराेधात कडक कारवाई करुन लाखाें रुपयांचा दंड वसुल केला.यामुळे वाळु माफीयात प्रचंड खळबळ उडाली हाेती.परंतु मध्यंतरी महसुल विभाग वाळु माफीया विराेधात कारवाई करतांना दिसत नसल्याने पुन्हा वाळु माफीयाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याचे चित्र दिसत आहे.वाळु माफीयाकडुन रात्री बेरात्री अवैध वाळु उपसा माेठ्या प्रमाणात केला जात आहे.त्यामुळे शासनाचा लाखाें रुपयांचा महसुल बुडत आहे.या वाळुमाफीयांनी आधुनिक पध्दतीचा वापर करुन ठिकठिकाणी एजंट उभे केले आहेत.शासनाच्या वाहनावर डाेळ्यात तेल टाकुन खडा पहारा देण्याचे काम संबधीत एजंट करीत आहेत.संबधीत विभागाचे वाहन दिसताच माेबाईल वरुन पथक आल्याची माहीती पथक घटनास्थळी पाेहचण्याच्या आगाेदर लागत असल्याने पथकाला कारवाई ऐवजी रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.तर काही वाळुमाफीयांच्या सतत संपर्क ठेऊन वरिष्ठांच्या दाै-याची परिपुर्ण माहीती जाणुन घेतांना पहावयास मिळत आहे.व तहसिल परीसरात वाळुमाफीयांचे जाळे पसरले आहे.परीसरात वरिष्ठांच्या हालचाली कडे लक्ष ठेवुन अवैध वाळु उपसाचे नियाेजन केले जात आहे.तालुक्यात वाळु माफीया कडुन अवैध वाळु चा रात्र दिवस उपसा करुन प्रति ट्राँली ५ ते ७ हजार रुपये प्रमाणे अवैध विक्री केली जात असल्याने वाळुमाफीयांना सध्या अच्छे दिन आल्याचे दिसुन येत आहे. परीणामी शासनाचा लाखाेंचा महसुल बुडीत निघत आहे.सेनगांव तालुक्यात हाेत असलेला रेती उपसा तात्काळ थांबवुन वाळुमाफीया विराेधात कडक कारवाई करणे गरजेचे आहे.या अवैध उपसा संबधी वाळु माफीयाकडुन आपले आर्थिक उखळ पांढरे केले जात आहे.संबधीता विरुध्द महसुल विभागाने गुप्त पध्दतीने पथक तयार करुन अवैध वाळु उपसा थांबविण्याची मागणी सेनगाव तालुक्यातील जनतेकडुन हाेत आहे.

No comments:

Post a Comment