Breaking News
Loading...

Wednesday, 6 September 2017

सत्संगामुळे आनंद :- बंडोपंत लाखेस्वामी


शांताराम मगर
वैजापुर:-गेल्या दोन वर्षापासून शिऊर येथील संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिरात विविध ग्रंथ  विवेचन करण्यात आले असून या दैनंदिन सत्संगामुळे मिळणारा आनंद वेगळाच असतो विष्णूसहस्रनामावली मुळे भगवंताचे नाम सामान्य जणापर्यंत पोहचत असून कलियुगात नामयज्ञ महत्वाचे असल्याचे असे स्वामींचे वंशज ह.भ.प बंडोपंत महाराज लाखेस्वामी यावेळी म्हणाले.

         अमृतानुभव, हरिपाठ, तुकोबारायांचा गाथा, निळोबा महाराजांचा गाथा आदी ग्रंथाचे विवेचन दैनंदिन प्रवचनमालेतून बंडोपंत लाखेस्वामी यांनी केले. यावेळी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, जे.के.जाधव, भागीनाथ मगर, पोपटराव जाधव, रामभाऊ जाधव, बबनराव जाधव, सरपंच नितीन चुडीवाल, माणिकचंद चुडीवाल, चंद्रशेखर खांडगौरे, गिरीश भावसार, ज्ञानेश्वर महाराज मधाने, पवन पाठक, प्रभाकर महाराज चन्ने,‍ सारंगधर महाराज भोपळे, कृष्णास्वामी, प्रभाकर आढाव,संजय जाधव, यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वितेसाठी बंडोपंत लाखेस्वामी, प्रभाकर तुपे, रामभाऊ ठेंगडे, लक्ष्मण ठेंगडे, गोविंदराव जाधव, अभिनंदन भावसार, भास्करराव भावसार, शिवराम जाधव, रंगनाथ आढाव, बाबुराव शेळके, हरिभाऊ सूर्यवंशी , विश्वनाथ जाधव, रघुनाथ शिंदे, साहेबराव जाधव, आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment