तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

गंगापूर शहरातील भारनियमन रद्द करा : नगराध्यक्ष वंदना पाटील यांची मागणी

प्रतिनिधी
    गंगापूर:-शहरात सध्या विद्युत वितरण कंपनी कडून मोठ्या प्रमाणात विजेचे भारनियमन सुरू आहे . आगामी सण उत्सवाच्या तोंडावर करण्यात येत असलेले भारनियमन तात्काळ रद्द करण्यात यावे , अशी मागणी नगराध्यक्ष वंदना प्रदीप पाटील यांनी विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे . 
       निवेदनात म्हटले आहे की, आगामी नवरात्र उत्सवात भारनियमन सुरू करणे अन्यायकारक आहे . सध्या सुरू असलेला उकाडा असह्य होत आहे . या उकाड्याने वृद्ध , आजारी लोक व लहान मुलांना फार त्रास होत आहे . त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने सध्या सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे , नसता विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालया समोर तिव्र आंदोलन छेडले जाईल , असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे

No comments:

Post a Comment