तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

परभणी जिल्ह्यातील उखळद येथे पत्नीनेचं केला प्रियकरासोबत संगमनत करुन पतीचा खुन

गोविद मठपती
=======================
ताडकळस:-पत्नीनेचं  प्रियकरासोबत संगमनत करुन पतीचा खुन केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील उखळद येथे घडली आहे,
अल्का हीचा विवाह काही वर्षापुर्वी परभणी जिल्ह्यातील उखळद येथे राहत असलेल्या आश्रोबा मल्हारी वाघमारे यांच्या सोबत झाला होता, पण कालांतराने अल्काचे प्रेम शेजारी राहत असलेल्या मनोहर याचावर जडले होते , आपल्या पत्नीचे प्रेम प्रकरण मनोहर सोबत असल्याची कुणकुण आश्रोबा याला लागली असल्यामुळे , अल्काचा पती हा अल्कावर पाळत ठेउन होता, आपला पती आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे कळताच अल्काने अल्काचा पती आश्रोबा वाघमारे याला संपविण्याचा विचार केला अन् दिनांक 12 /09 /2017 रोजी मंगळवारी मध्यरात्री 11:30 ते 12:00 च्या सुमारास अल्काचा प्रियकर मनोहर वाघमारे व अल्काने अल्काचा पती आश्रोबा यांच्या छातीवर व पोटावर चाकुने सपासप वार करुन खुन केला, अन् खुनाची बातमी वा -यासाखी गावभर पसरली ही बातमी मृत आश्रोबा चा भाऊ कैलास वाघमारे यांना कळताच त्यांनी ताडकळस पोलिस ठाण्यात फोन करुन माहीती दिली व कैलास वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन ताडकळस पोलिस ठाण्यात आरोपीवर कलम 302/34 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे व आरोपीला पोलीसांनी तात्काळ आटक केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश लांडगे व सब ईन्सपेक्टर वाघमारे हे करीत आहे
=======================

No comments:

Post a Comment