Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

ब्रह्माकुमारीज विद्यालयात राजयोग शिबिर आरंभ

महेंद्र महाजन जैन
रिसोड:-प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय रिसोड येथे सात दिवशीय राजयोग शिबिराचा १३ सप्टेंबर बुधवारला प्रारंभ झाला.१३ ते १९ सप्टेंबर चालणाऱ्या या शिबिराला विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी ज्ञान दान करणार आहेत. दर महिन्याला या विद्यालयातून राजयोग शिबिराचे आयोजन केले जाते प्रत्येक शिबिराला शिबिरार्थी स्वयंस्फूर्तीने नाव नोंदवून सहभाग नोंदवीत आहेत. ब्रह्माकुमारी ज्योती दीदीं विद्यालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवित असतात शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यालयाने रिसोड तालुक्यातील १६०शिक्षकांचा सत्कार घेतला त्यातील अनेक शिक्षक या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. शिबिराच्या नियोजनाकरिता ज्योती दिदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे ज्ञानार्थी परिश्रम घेत आहे

महेन्द्र महाजन जैन
9960292121

No comments:

Post a Comment