तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Monday, 11 September 2017

'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी होऊन उपजिल्हाधिकारी अडचणीत.


_________________________

छत्तीसगड मधील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्याची सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होऊन चांगलीच अडचण झाली. विषय एवढा गंभीर बनला, की छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. मंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुराधा अग्रवाल यांची निवड ‘कौन बनेगा करोडपती’ साठी झाली होती. भोपाळमध्ये ऑडिशन झाल्यानंतर अनुराधा अग्रवाल यांना कार्यक्रमाच्या शुटिंगसाठी मुंबईला बोलावण्यात आलं.

अनुराधा दिव्यांग आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये सहभागी होऊन तिथे मिळालेल्या पैशातून भावाच्या किडनीवर उपचारासाठी पैसे जमा करणं अनुराधा यांचा उद्देश होता. या कार्यक्रमाच्या शुटिंगच्या एक दिवस अगोदरच अनुराधा यांच्या आईचं निधन झालं. मात्र कुटुंबीयांच्या सल्ल्यामुळे अनुराधा मुंबईला रवाना झाल्या. उत्तरं देऊन पैसे मिळवले, मात्र सरकारी औपचारिकतांमुळे अडचणअनुराधा यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन अमिताभ बच्चन यांच्या समोरच्या हॉट सीटवर बसून प्रश्नांची खणखणीत उत्तरं दिली. त्यातून त्यांना चांगले पैसेही मिळाले. मात्र मुंबईहून परतल्यानंतर त्यांना समजलं की कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना परवानगीच देण्यात आली नव्हती. अनुराधा यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी मिळवली होती. मात्र वेळेवर पत्र न मिळाल्यामुळे त्यांनी सुट्टी टाकून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र अनुराधा यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये सहभागी होण्याचा निर्णय अमान्य करण्यात आल्याचं पत्रसामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांनी अनुराधा यांना पाठवलं.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल...

अनुराधा यांचं प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. प्रशासकीय अधिकाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होण्याची परवानगी अधिकृतपणे परिपत्रक जारी करुन दिली जाते. मात्र राज्यातील एखाद्याची बुद्धी राष्ट्रीय स्तरावर दाखवण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना रोखलं जातं, असा घणाघात काँग्रेसने भाजप सरकारवर केला.या प्रकरणाने राजकीय वळण घेतल्यानंतर सरकारने नमतं घेत अनुराधा यांना परवानगी दिली. मुख्यमंत्री रमन सिंह यांनी याबाबतची औपचारिकता पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. सरकारने परवानगी दिल्यामुळे आता भावावर उपचार करणार असल्याचं अनुराधा यांनी ‘बीबीसी’शी बोलताना सांगितलं. सोनी टीव्हीवरील या भागाचं प्रक्षेपण 20 सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे.

No comments:

Post a Comment