तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 9 September 2017

गेवराई मुस्लिम बांधवांचा मुक मोर्चा; तहसिलदारांना निवेदन

सुभाष मुळे....
-----------------
गेवराई:- दि ८ __ म्यांनमार येथील रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या नरसंहार विरोधात गेवराई शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी मुक मोर्चाच्या माध्यमातुन तहसिलदार यांना निवेदन देत निषेध केला आहे.
     रोहिंग्या मुस्लिम यांना म्यानमार सरकार सैन्य अभियान राबवत निष्पाप मुस्लीमांची सामुहिक हत्याकांड करत आहे. लहान मुलांना ठार मारण्यात येत आहे, तर महिलां सोबत बलात्कार करुन क्रुरपणे जिवंत जाळले जात आहे. म्हणुन भारत सरकारने संयुक्त राष्ट्रामार्फत म्यांनमारच्या सरकारवर निर्बंध घालत अत्याचार थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने मानवतेच्या भावनेतुन म्यांनमारवर कारवाही करण्यासाठी दबाव टाकावा यासाठी गेवराई तालुक्यातील हजारो मुस्लिम बाधंवानी शुक्रवार, दि. ८ रोजी शिवाजी चौक येथुन शास्त्री चौक, मेन रोड मार्गे गेवराई तहसिल कार्यालयावर मुक मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन देत निषेध नोंदवला.
         यावेळी सभापती जानमहंमद बागवान, नगरसेवक याहिया खान, मुन्नासेठ, फेरोज सेठ, मंजुर बागवान, जमिल अत्तार विजयसिंह पंडित, मुफ्ती युनुस, मुफ्ती गयाज, मौलाना, तोफिक तांबोली, मुफ्ती हाफीज सहाब, ईरफान बागवान, शेख अमजद, जुनेद बागवान, शोहेब अत्तार, भाजप अल्पंसख्याक तालुकाध्यक्ष सय्यद एजाज, शेख एजाज, इर्शाद फारोकी, शेख सुभान, जे.डी.शहा, खलील कुरेशी, खदीर बागवान, अॅड. शेख अब्बास यांच्यासह हजारो मुस्लिम बांधव मुक मोर्चा मध्ये सामील होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment