Breaking News
Loading...

Saturday, 9 September 2017

कॉग्रेसच्या दबावामुळेच कर्जमाफी : राहुल गांधी

परभणी : प्रतिनिधी
दोन वर्षापुर्वी सत्तेवर आलेल्या एनडीए सरकारने सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या ऐवजी फक्त ५० उद्योगपतींचीच कर्जमाफी केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी सुध्दा कॉर्गेसच्या दबावामुळेच केली असल्याचे कॉग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगीतले.
कॉर्गेसच्या वतीने परभणी शहरात आयोजीत करण्यात आलेल्या संघर्ष सभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,माजीमंत्री अब्दुल सत्तार, माजीमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजीमंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खा. राजीव सातव, विश्वजीत कदम,माजी आ.सुरेश देशमुख,आ.संतोष टारफे आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना गांधी म्हणाले ,सरकारने ४५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याचे सांगीतले परंतू  वास्तवात ५ हजार कोटी रुपायाची कर्ज माफी  केली आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफीचा अर्ज भरायला लावून त्यात त्याची जात विचारली जाते. सरकार फक्त उद्योगपतींचेच काम करते देशाचा ९० टक्के काळा पैसा हा सोने जमीन आणि स्वीस बॅकेस आहे. असे असतांनाही दहा टक्के नगदी  पैशांसाठी गाजावाजा करत नोटबंदी केली. त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात असून तरु़णांनाही रोजगार उपलब्ध नाही. याऊलट पंतप़्रधानांनी सफाई मोहीम हाती घेतली या अडीच वर्षाच्या कार्यकाळात सुमारे ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. देशातील शेतकरी दररोज ओरडतो आहे. परंतू सुटाबुटातील सरकारला शेतकऱ्यांचे गऱ्हाणे ऐकायला वेळ नाही.कॉग्रेसच्या कार्यकाळात ७० हजार करोड कर्ज माफी झालेली आहे.मागच्या सात वर्षाच्या कार्यकाळात सर्वात जास्त बेरोजगार असल्याचे भाजपचे मंत्री सांगतात फक्त खोटे आश्वासन देवून हे सरकार सत्तेवर आले आहे.जनतेचे मात्र हाल सुरु आहेत. जीएसटीच्या निर्णयातही देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहचले आहे. या सरकारने केलेली जीएसटी छोटे दुकानदार व उद्योगांना मारणारी आहे. नोटबंदीतही देशातील फक्त चोरांचा काळा पैसा मोदींनी पांढरा केला अशी टिकाही त्यांनी यावेळी बोलतांना केली.

No comments:

Post a Comment