Breaking News
Loading...

Saturday, 9 September 2017

अल्पसंख्यांक शाळा व मदरशांनी अनुदानासाठी प्रस्ताव पाठवावेत

परभणी
राज्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगीक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना त्याचप्रमाणे राज्यातील नोंदणीकृत मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा अधुनिकीकरण योजना मंत्रीमंडळाच्या मान्यतेनुसार शासन निर्णयान्वये सदर योजनेअंतर्गत पात्र शाळा व मदरसा यांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

            योजना सन 2017-18 या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. योजने अंतर्गत सन 2017-18 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळा व मदरसा यांच्याकडून प्रस्तावाची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती मार्फत दिनांक 11 ऑक्टोबर 2013 व 07 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र शाळा व मदरशाची शासनास शिफारस करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. शाळा व मदरशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतीम दिनांक 18 सप्टेंबर 2017 असुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावांची छाणनी करुन त्रुटींची पुर्तता करुन अंतीमरित्या पात्र प्रस्ताव शासना 18 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

No comments:

Post a Comment