तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

शनिवारी कर्क राशीमध्ये चंद्र आणि राहू आल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीचे लोक चिंताग्रस्त राहतील. नशीब आणि पैशांच्या बाबतीत या राशीचे लोक अनलकी ठरू शकतात. यामुळे या 7 राशीच्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांना दिवस सामान्य राहील परंतु काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार....

मेष - खर्च वाढता असला तरीही आर्थिक समतोल सांभाळू शकाल. घरात शुभकार्य घडेल. येणारी कुठलीही संधी वाया घालवू नका. शब्दात मात्र अडकू नका. शुभ रंग : राखाडी, अंक-७.

वृषभ - सज्जनांचा सहवास लाभेल. स्वप्नांची पूर्तता होईल. ध्येयप्राप्तीसाठी तहान भूक विसरुन काम केल्याने आपला प्रगतीरथ वेगाने धावणार आहे. शुभ रंग : मोरपंखी, अंक-२.

मिथुन - प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा. भावनिक गुंतागुंत नको. मोठया आर्थिक उलाढाली आवर्जुन टाळा. वाहन चालवताना मोबाइल बंद ठेवा. शुभ रंग : निळा, अंक-१.

कर्क - आज आपला कार्यक्षेत्रातील सन्मान वाढेल. स्पर्धकांनाही तुमचा हेवा वाटेल. अनावश्यक खर्च कमी करुनच आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवता येईल. शुभ रंग : केशरी, अंक-४.

सिंह - घराच्या नूतनीकरणासाठी खर्च करावा लागेल. थोरोचे मूड सांभाळावे लागतील. नव्या रोजगाराच्या संधी येतील पण त्या घरापासून लांब असतील. शुभ रंग : सोनेरी, अंक-८.

कन्या - प्रतिष्ठीतांशी सुसंवाद घडेल. महत्वाच्या कामाची आज केलेली सुरवात लाभदायक ठरेल. सकारात्मकता वाढेल. आप्तस्वकीय मित्रमंडळींत मान मिळेल. शुभ रंग : चंदेरी, अंक-५.

तूळ - प्रत्येक निर्णय संयमाने घेणे गरजेचे आहे. नोकरीच्या ठीकाणी बिनचूक कामास प्राधान्य द्यायला हवे. कायद्याबाहेर केलेले वर्तन उघडकीस येऊ शकेल. शुभ रंग : नारिंगी, अंक-४.

वृश्चिक - वडीलधाऱ्यांना अभिमानास्पद वाटण्याजोगी एखादी कामगिरी तुमच्या हातून घडेल. सत्संगाने मानसिक ताण- तणाव कमी होईल. धार्मिकता वाढेल. शुभ रंग : हिरवा, अंक-१.

धनू - अधिकारी वर्गाकडून जांच होईल. नसत्या उठाठेवी न करता फक्त स्वार्थ पहा. आपल्या मर्यादेत रहा व काहीही झालं तरी कायदा मोडू नका. शुभ रंग : राखाडी, अंक-३.

मकर - अाज तुमचा कसोटीचा दिवस असून विरोधकांशी मिळते जुळते घ्यावेच लागणार आहे. जोडीदारच आज योग्य सल्ले देईल. कोर्टाची पायरी न चढलेलीच बरी. शुभ रंग : मोरपंखी, अंक-९.

कुंभ - आज काहीसा दगदगीचा व धावपळीचा दिवस असला तरीही तुम्ही घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. भावंडांत सलोखा राहील. शुभ रंग : जांभळा, अंक-२.

मीन - आज पारिवारीक वातावरण साैख्यपूर्ण असेल. इतरांना उपदेशाचे डोस पाजता येतील. प्रेमप्रकरणांस आज घरच्या मंडळींकडून आशिर्वाद मिळतील. शुभ रंग : पांढरा, अंक-६.

No comments:

Post a Comment