तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

बाळाच्या जन्मानंतर आईवडिलांना होणाऱ्या आनंदाला सीमा नसतात. इथल्या एका दाम्पत्याला 'चौपट आनंद' झाला आहे. जे. जे. रुग्णालयात एका महिलेने एकाचवेळी एक, दोन नव्हे तरचार बाळांना जन्मदिला आहे. जहानरा शेख या 29 वर्षाच्या महिलेचे नाव आहे. जहानरा नाशिकची असून गेल्या पाच महिन्यांपासून उपचारासाठी जे. जे. मध्ये येत होती.

राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत हिच्या बद्दल मोठी बातमी येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीत, आदित्य इंसा सोबत नेपाळ मध्ये लपून बसलेली आहे. हनीप्रीत आणि आदित्य इंसाबरोबर आणखी एक व्यक्ती असल्याचं देखील बोललं जातंय. हरियाणा पोलिसांनी हनीप्रीतला शोधण्यासाठी नेपाळ पोलिसांची मदत मागितली आहे.

मुंबई = वांद्रे-वरळी सी-लिंकवर कार चालकाचा टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला. टोल देण्यावरुन झाला वाद

कोंढाव्यात मांजराची निगा न राखल्याने चक्क महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. दीपिका कपूर आणि संगिता कपूर असं गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावं आहेत.

इरमा वादळाच्या कहरानं अमेरिकेतल्या मियामीची धूळदाण, 40 जणांचा बळी तर 10 लाख घरांचं नुकसान, 60 लाख घरांमधला वीजपुरवठा खंडीत.


प्रद्युम्न हत्या प्रकरण- रायन,ग्रेसी, ऑगस्टीन पींटोची अटक उद्यापर्यंत टळली. रायन ग्रुप सीईओ, एमडींना मुंबई हायकोर्टाचा दिलासा. जामीन अर्जावर उद्या पुन्हा होणार सुनावणी.

रत्नागिरी = पूर्णगड खाडी मध्ये मच्छीमारांची बोट उडाली. बोट उलटून तीन सख्ख्या भावांसह चारजण बुडाले. एकाचा मृतदेह सापडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार दोन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर. कोट्यवधी रूपयांच्या योजनांचं करणार लोकार्पण.


नाशिक = मानसिक रूग्णाकडून हल्ला. तिघांचा मृत्यू. नांदगावमधील हिंगण देवरे गावातील घटना. कुऱ्हाडीन घाव केल्याने तिघांचा मृत्यू तर 5 ते 6 जखमी. जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू.

अण्णाद्रमुकच्या आज होणा-या बैठकीत शशिकलाला पदावरुन हटवण्यात येण्याची शक्यता.


बगदाद = शोधमोहिमे दरम्यान इराकी सुरक्षा दलाच्या जवानांनी आयसिसच्या 80 दहशतवाद्यांना केलं ठार.


मुख्यमंत्र्यांकडून लोकप्रतिनिधींची कानउघाडणी, मुंबईतील आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुनावले.


आपला संदेश कसा पोहोचवायचा हे पंतप्रधान मोदींना चांगले कळते, त्यांची संवाद साधण्याची पद्धत प्रभावी आहे - राहुल गांधी.


पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांच्या बरोबर काम करतात त्यांच्याशी कुठलीही चर्चा करत नाहीत, भाजपाच्या अनेक खासदारांनी मला हे सांगितले आहे , मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेविरोधात आहे- राहुल गांधी, उपाध्यक्ष काँग्रेस.

मुख्य आर्थिक सल्लागार आणि संसदेला विचारात न घेता अंमलात आणलेल्या नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे प्रचंड नुकसान झाले आहे ,भारताने रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे - राहुल गांधी, उपाध्यक्ष काँग्रेस.

भिवंडीत मुसळधार पावसामुळे झाड कोसळून दोन ठार, सहा जण जखमी.

रामेश्वरम किनारपट्टीजवळ श्रीलंकन नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना घेतले ताब्यात, तीन बोटी केल्या जप्त.

No comments:

Post a Comment