Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन


परभणी : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा. त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या
पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ता व सेवक यांनी विहीत नमुन्यातील अर्ज बुधवार २० सप्टेंबरपर्यंत तीन प्रतीत जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेतआवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment