तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 17 September 2017

श्री महालिंगेश्वर विद्यालयात ग्रंथदान


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ :  श्री महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक जोशी पी.एल. यांच्याहस्ते महात्मा गांधी व थोर सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ध्वजारोहन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाचे सिद्धार्थ सोनाळे  यांनी मराठवाडा स्फुर्तीगीत गायले तर विद्यार्थिनींनी समयोचित मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.पूजा श्रीधर मुळे हिने तिच्या वाढदिवसा निमित्त मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी ग्रंथदान केले. ग्रंथ भेट विद्यालयाचे मुख्याध्यापक जोशी पी.एल. व सोनपेठ नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा सोनपेठ नागरी सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन रमाकांतराव जहागिरदार यांनी स्विकारली. यावेळी विद्यालयाचे सेवानिवृत्त ए.बी. आदोडे, चौंढे अप्पा तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षीका व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन सहशिक्षक नामदेव निळे यांनी केले तर सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने ग्रंथदान केल्याबद्दल पुजा मुळे हीचे आभार व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment