तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

दहावी व बारावी च्या शालांत परीक्षेत पहिले आल्याने,प्रत्येकी पाच हजार रुपये चा धनादेशाचे वाटप.

प्रतिनिधी
भोकरदन:-तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री छञपती संभाजी विद्यालयातील विद्यार्थीनी कोमल प्रेमसिंग ताटु 12 वी कला शाखेत 2017 मध्ये विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला तर वर्ग दहावी च्या शालांत परीक्षा मार्च 2017 मध्ये प्रमोद कमलाकर वैष्णव हा चांगले गुण घेऊन विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला बद्दल सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,जालना यांच्या कडुन "राजषीॅ शाहु गुणवत्ता पुरस्कार प्रत्येकी रक्कम पाच हजार चा धनादेश विद्यालयाचे प्राचार्य संजय पैठणकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी 10 वी,12वी च्या शालांत परीक्षा मार्च 2017 मध्ये विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी प्रमोद कमलाकर वैष्णव,कु. कोमल प्रेमसिंग ताटु सह पालक प्रेमसिंग ताटु,सह शिक्षक डी बी ठाकरे,पी एम पाटील,व्ही बी कल्याणकर,के व्ही फुके,प्रा. समाधान सोनवणे,जे एच सुरासे सह शालेय विद्यार्थी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment