तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 16 September 2017

रोटरी क्लबचा "राष्ट्र शिल्पकार" दिनकर शिंदे यांना पुरस्कार

सुभाष मुळे....
-----------------
गेवराई, दि. 16 __ गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय राहून, उल्लेखनीय काम करणाऱे पत्रकार दिनकर शिंदे यांची यावर्षीच्या रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या " राष्ट्र शिल्पकार" पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सोमवार, दि. 18 सप्टेंबर रोजी बीड येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
       शोभादेवी महिला सेवाभावी संस्था संचालित, राजमाता जिजाऊ विद्यालय, रानमळा तालुका गेवराई येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले पत्रकार दिनकर शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात हिरीरीने काम करीत आहेत. शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी अनेक विद्यार्थी आजवर घडवले आहेत. विविध क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदाना बद्दल दिनकर शिंदे यांना नेहरू युवा केंद्राचा "जिल्हा युवा पुरस्कार", दिल्ली येथील " डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवार्ड", डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषदेचा " म. फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार" आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. अष्टविनायक ज्ञानदीप कला व क्रीडा मंडळाच्या माध्यमातून, नाट्य, नृत्य आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर तसेच विविध शैक्षणिक स्पर्धा उपक्रम, अविरतपणे राबवून तालुक्यातील सांस्कृतिक व शैक्षणिक चळवळ जिवंत ठेवण्याचे काम केलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन यांनी यावर्षीच्या " राष्ट्र शिल्पकार" या पुरस्कारासाठी निवड केली आहे. दि. 18 सप्टेंबर रोजी बीड येथे आयोजित कार्यक्रमात दिनकर शिंदे यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचे अध्यक्ष अतुल संघाणी, सचिव सी.ए. आदेश नहार, प्रोजेक्ट चेअरमन प्रा. नितीन भोसले, प्रोजेक्ट चेअरमन नितीन गोपन यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
       "राष्ट्र शिल्पकार" पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल दिनकर शिंदे यांचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, संस्थेच्या अध्यक्षा सौ. गिरीकाताई पंडित, जि.प. सभापती युधाजित पंडित, सचिव सौ. अनुरूपाताई पंडित, उपसभापती भीष्माचार्य दाभाड़े, युवानेते रोहित पंडित, पत्रकार सुभाष मुळे, मुख्याध्यापक प्रमोद देसले, केशव तळेकर, अमोल राजापूरकर, पत्रकार सुभाष मुळे, मधुकर तौर, जगदीश बेदरे, अंकुश आतकरे, प्रा. राजेंद्र बरकसे, संतोष भोसले, अय्युब बागवान, सुभाष सुतार, सखाराम शिंदे, भागवत जाधव, गणेश क्षीरसागर, प्रदीप जोशी, वैजीनाथ जाधव, जुनेद बागवान, विनोद पौळ, कैलास हादगुले, सुनील मुंढे, विनोद नरसाळे, मंगेश चोरमले, अमोल वैद्य, सुनील पोपळे, सतीश शिंदे, प्रसाद कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment