तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

गौरी यांच्या हत्येचा गंगापूर येथे अखिल भारतीय  मराठी पत्रकार संघाकडुन  जाहीर निषेध

गंगापुर (प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येनं संपूर्ण कर्नाटक राज्यच नव्हे तर पत्रकारिता क्षेत्र  हादरून गेलं आहे. या घटनेचा अखिल भारतीय  मराठी पत्रकार संघ. गंगापुर तालुका. यांनी तहसिलदार चंद्रकात शेळके यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आले हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी  मराठी पत्रकार  संघाचे अध्यक्ष लालखाँ पठान यांनी  केली आहे. यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार श्रीराम ठोंबरे म्हणाले की पञकारिता करणे किती जिकिरीचे बनले आहेत ते प्रसंग जिवावर देखील बेतु शकते यांचे उदाहरण म्हणजे कर्नाटकातील गौरी लंकेश यांच्या झालेल्या निर्धुन हत्या मुळे शासनाने पञकार संरक्षण कायदा त्वरित अंमलात आणावा व गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी जेष्ठ पत्रकार श्रीराम ठोंबरे यांनी केले आहेत

कर्नाटक राज्यातील बंगळुर येथे ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांना गोळ्या झाडुन क्रुरतेने हत्या करण्यात आली आहे. अशा प्रकारे हत्या करून वास्तव दाबण्याचा प्रयत्न हल्लेखोरांचा दिसतो. या घटनेमागील वास्तव समोर येणे गरजेचे आहे. विचाराचा लढा विचारानेच हवा रक्तपाताने नव्हे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व या हल्ल्यामागे खरे सुत्रधार कोण आहेत हे समोर यावेत. यासाठी शासनाने कठोर भुमिका घ्यावी अन्यथा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ लोकशाही पध्दतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा ही अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष लालखाँ पठान यांनी तहसिलदार चंद्रकात शेळके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार श्रीराम ठोंबरे उत्तमराव केदारे बबनराव जगताप धनंजय ठोबंरे सदाशिव जंगम शहर अध्यक्ष हरुन पठान अनवर बागवान रमेश ठोंबरे बाळासाहेब लोणे मकसुद खाँन लोधी विनोद जाधव कदिर शेख प्रमोद जाधव राजू जाधव सोमनाथ शिंदे 

आदि  पञकार यांनी तीव्र स्वरूपात घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

No comments:

Post a Comment