तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

सदाभाऊ खोत यांच्या नव्या संघटनेचं नाव 'रयत संघटना'?

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी नव्या संघटनेची घोषणा केली. अद्याप या संघटनेचं नाव ठरलेलं नाही, मात्र 'रयत संघटना' असं या संघटनेचं नामकरण होण्याची शक्यता आहे.

सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्टरबाजी करण्यास सुरुवात केलीय. 'रयतेचा राजा', 'रयतेची संघटना', 'रयतेचा बिल्ला', असं या पोस्टर लिहिण्यात आलंय.

दरम्यान, नेत्यांचे फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खाली टाकल्याने या पोस्टरवर जोरदार टीकाही होतेय.

No comments:

Post a Comment