तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने ज्युनियर अकाउंट्स अधिकाऱ्यांची भरती करण्याची अधिसूचना जारी केली आहे. बीएसएनएलने 996 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक उमेदवार बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगऑन करू शकतात.  5 नोव्हेंबरला ही चाचणी होणार आहे.

आम्ही इंटरनेटवर ट्रोलिंग आणि हिंसक वर्तनाच समर्थन नाही करत : मोहन भागवत

तीन नद्यांना जोडण्यासाठी तीन महिन्याच्या आत सुरु होणार काम : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली = केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 टक्क्याने वाढ

कल्याण मध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार,तिघांना अटक.

वर्धा = कारंजा तालुक्यात असलेल्या स्टेट बँकेच्या मिनी शाखेत 22 लाखांचा घोळ. एकाला अटक.


महाराष्ट्रातील ग्रामपंचायतच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला तर 17 ला मतमोजणी, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती.


लातूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक अंकुश माने (42) याला लाचप्रकरणी पोलीस कोठडी.

अहमदनगर = निंबोडी जि.प. शाळा दुर्घटना प्रकरण, तत्कालीन उपअभियंता एच एम विधातेला अटक, एक दिवसाची पोलिस कोठडी, जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय.

केंद्र सरकारी कर्मचा-यांचा एक टक्क्याने महागाई भत्ता वाढणार.


एकतर्फी प्रेमातून खून करणा-या युवकाला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा, यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल.


सिंधुदुर्ग = कोकण रेल्वेला राजभाषा किर्ती पुरस्कार, उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत होणार गौरव.


मुंबई = अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबतची शिष्टमंडळाची चर्चा फिस्कटली.


कोल्हापूर = अश्विनी रामाणे यांचे नगरसेवकपद वैध, उच्च न्यायालयाचा निर्णय, पोटनिवडणूक रद्द.


नाशिक = चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा शिवणकामाचा कात्रीने खून करणारा आरोपी संजय रघुनाथ वाघ यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी जन्मठेपेची शिक्षा दिली

फादर टॉम यांची येमेन मधून सुटका, जवळपास 18 मिहिने इसिसने बंधक बनवून ठेवले होते.


भिवंडी = खारेगाव टोलनाका येथे अपघात.दुचाकीला कंन्टेनरने चिरडले.


अहमदनगर = भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन.

बीड = 30 सप्टेंबरला भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली.

पश्चिम बंगाल मध्ये राजकीय हिंसाचारात बळी पडलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी भेट घेतली.


लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू- राजू शेट्टी


औरंगाबाद = गणेश कोपरवाड या संगणक शास्त्र विद्यार्थ्याची विद्यापीठ वसतिगृहात आत्महत्या.


मुंबई = सोमवार पासून बेमुदत संप पुकारलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकला आझाद मैदानावर. मोर्चात हजारो महिलांचा सहभाग.

मुंबई =  बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरण, रियाझ सिद्दिकीला जन्मठेप, टाडा कोर्टाचा निर्णय.

No comments:

Post a Comment