तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 10 September 2017

सेनगांव येथे भव्य सर्व राेग निदान माेफत शिबिरात तब्बल ३ हजार १४५ रुग्णांची माेफत तपासणी सेनगांव शहरातील आज पर्यंतचे रेकाँर्ड ब्रेक माेफत शिबिर


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- येथे मकाेडी फाटा जवळील संत नामदेव कृषी बाजार मध्ये आज दि.१० सप्टेंबर रविवार राेजी स्वर्गीय हितेश व्दारकादासजी सारडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य सर्व राेग निदान माेफत नेत्र तपासणी, माेतीबिंदु शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयाेजन केले हाेते. या शिबिरात तब्बल ३ हजार १४५ रुग्णांची माेफत तपासणी केल्याने हे शिबिर आज पर्यंतचे रेकाँर्ड ब्रेक माेफत शिबिर झाले.
या शिबिराचे उदघाटन आ.रामरावजी वडकुते यांच्या हस्ते संपन्न झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊराव पाटील गाेरेगांवकर हे हाेते. तर प्रमुख उपस्थिती हिंगाेली जिल्हा परीषद चे उपाध्यक्ष अनिलजी पतंगे,हिंगाेली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा माजी सभापती आप्पासाहेब देशमुख,सेनगांव कृ.ऊ.बा.समिती सभापती शंकरराव बाेरुडे,माजी सरपंच गाेपाळराव देशमुख,सेनगांवचे उप नगराध्यक्ष कैलास देशमुख,हिंगाेली जिल्हा शिवसेना उप जिल्हाप्रमुख संदेशजी देशमुख,विनायकराव देशमुख,काँग्रेसचे सेनगांव तालुकाध्यक्ष प्रकाशराव देशमुख,जि.प.सदस्य रामरतन शिंदे,नगरसेवक उमेश देशमुख,मनाेज तिवारी,डाँ.टि.जी.पाटील,डाँ.आर.व्ही.देशमुख,विलास खाडे,सुर्यभान ढेंगळे,अशाेक ठेंगल,गजानन पाेहकर पत्रकार राजकुमार देशमुख,केशव भालेराव,विश्वनाथ देशमुख सह आदी मान्यवंराची उपस्थिती हाेती. या शिबिरात डाेळे तपासणी १५०० रुग्णांची झाली,ह्रदयराेग तपासणी ३४३,स्त्रीराेग तपासणी २८५, हाडांचे रुग्ण तपासणी २१३, दाताचे तपासणी ८६, जनरल सर्जन तपासणी १७१, किडनी राेग तपासणी ३५,जनरल तपासणी ४३२ तर ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सेनगांव शहरातील आज पर्यंतचे रेकाँर्ड ब्रेक माेफत शिबिर झाल्याची नाेंद आज झाली. या शिबिरात नामाकींत डाँक्टर डाँ.सुशिल राठी,डाँ.रामनिवास काबरा,डाँ.प्रविण मुंदडा,डाँ.विठ्ठल राेडगे,डाँ.विवेक साबु,डाँ.राेशन बंग,डाँ.विजयसाई शेळके,डाँ.वल्लभ महाथेर,डाँ.नेहा बाहेती व नागपुर वरुन ९ तर नांदेड वरुन ४ नामाकिंत डाँक्टरांना या शिबिरात पाचारण करण्यात आले हाेते. यावेळी संत नामदेव कृषी बाजार कडुन माजी जि.प.सदस्य व्दारकादासजी सारडा,गिरीधारजी ताेष्णीवाल,प्रितेश सारडा यांनी अधिक परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment