Breaking News
Loading...

Tuesday, 12 September 2017

हालगी वाजवत रणरागिणी दारूबंदीसाठी मैदानात


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स
सोनपेठ  :
तालुक्यातील मौजे नरवाडी येथील दारूबंदीसाठी रणरागीणी सरसावल्या आसुन गावातील महिलांनी अवैध दारूविक्री करणाऱ्या दुकानावर मोर्चा काढला.
तालुक्यातील नरवाडी येथील तळीरामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथील महिलांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. येथील शेकडो महिला आज रस्त्यावर उतरल्या होत्या.
गावातील तरूणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढले आसुन यामुळे भावी पीडी व्यसनाधीन होत आहे आणि यासंदर्भात गावात यापुर्वी व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन पण झाले आहे,गावातील नागरिकांनी यापुर्वी पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन व जिल्हाधिकारी यांना गावात होत आसलेली अवैध दारूविक्री बंद करून गावात दारूबंदी करावी यासंदर्भात वेळोवेळी निवेदने दिली आहेत.
निवेदन देऊन सुध्दा गावात अवैध दारूविक्री थांबत नसल्यामुळे गावात दारू पिनारांची संख्या वाढतच होती याचा परिणाम थेट महिलांवर होत आसल्याने येथील शेकडो महिला दारूबंदीसाठी संघटित झाल्या.
महिलांना या मोर्चात सहभागी होन्यासाठी महिलांनीच हालगी वाजवत अवहान केले,त्यानंतर महिला मोठ्या संख्येने जमवुन या महिलांचा मोर्चा येथील अवैध दारूविक्री करना-या दुकानावर धडकला
या मोर्चात महिलांनी पुढाकार घेतल्याने मोर्चात गावातील नागरिकांसह सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, छावा संघटना, शेकाप व राजे शिवाजी मित्रमंडळाचे कार्यकर्ते सुध्दा सहभागी झाले होते.
एकंदरीतच नरवाडी तील महिला दारूबंदी संदर्भात आक्रमक झाल्याने संपूर्ण तालुक्यातील दारूविक्री करणारांचे धाबे दनानले आहेत.
गावातील दारूबंदी संदर्भात येथील अवैध दारूविक्री करणाऱ्यांना दम देत यापुढे जर गावात दारू आढळुन आलीच तर येथील शेकडो महिला तालुकास्तरावर मोठे आंदोलन छेडण्याच्या तयारीत आसल्याचे  महिलांनी या मोर्चात बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment