तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

लोअर दुधना प्रकल्पात आढळला शिक्षकाचा मृतदेह

सेलू (प्रतिनीधी)
        लोअर दुधना प्रकल्पाच्या पाण्यात एका शिक्षकाचा मृतदेह सोमवारी 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वा सुमारास आढळुन आल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आसुन हा प्रकार आत्महत्या की आन्य प्रकार हे मात्र पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल
           याबाबत आधिकृत माहिती अशी की लोअर दुधना प्रकल्प चे सहाय्यक आभियंता  सुधीर सबनिस यांनी सेलू पोलीस ठाण्यात खबर दिली की लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या गेट जवळ च्या  पाण्यात उताना तरंगलेल्या आवस्थेत मृतदेह सकाळी 10:30  आढळुन आला  या खबरीवरून सेलू पोलीस ठाण्यात अकस्मीक मृत्युची नोंद झाली .घटनास्थळी  बीट जमादार के एस कादरी हे दाखल झाले त्यांनी मच्छीमार यांच्या सहकार्याने सदर प्रेत पाण्याच्या बाजुला घेतले त्या नंतर सदरील मृतदेह हा शरद काशिनाथ लिपणे(वय 32 वर्षे ) यांचा आसल्याचे स्पष्ट झाले
शरद लिपणे हे रा सेलगांव ता परतूर  येथील आहेत रायगड जिल्हायातुन एक वर्षापुर्वी ते जिल्हा परीषद शाळा आंगलगाव ता परतुर येथे जिल्हा बदली आंतर्गत शिक्षक म्हणुन रूजू झाले होते ते सध्या सेलू वास्तव्यास होते येथुन आंगलगांव येथे येणे जाणे करीत होते
      शरद लिपणे हे 11 सप्टेंबर रोजी शाळेत जातो म्हणुन निघुन गेले होते त्या नंतर हा प्रकार समोर आला त्यामुळे या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली परंतू हा प्रकार आत्महत्या की अन्यप्रकार  हे मात्र पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल
मृतदेहाची उत्तरीय तपासणी उपजिल्हा रूग्णालय सेलू येथे करण्यात आली त्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले प्रकरणाचा तपास स पो नी नितिन काशिकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार के एस कादरी हे करीत आहे

सि सि टि व्ही तुन उलगडा होईल

लोअर दुधना प्रकल्पा आंतर्गत लावण्यात आलेल्या सिसिटिव्ही कँमेरा यांचे फुटेज  तपासल्या नंतर या प्रकरणाचा उलगाडा समोर येईल

No comments:

Post a Comment