Breaking News
Loading...

Saturday, 9 September 2017

महिलांनसाठीचे शेळीपालन कौशल्य प्रशिक्षण संपन्न

प्रा.डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ / प्रतिनिधी :
तालुक्यातील दुधगाव येथील बचत गटांच्या महिलांसाठी घेतलेले शेळीपालन कौशल्य प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा व सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्र सोनपेठ ,तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्ग उपजीविका विकास घटकामध्ये शेळीपालन कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन करन्यात आले होते.
तिन दिवस चाललेल्या या कौशल्य प्रशिक्षणाचे पहिल्या दिवशी उदघाटन झाले.
यावेळी कार्याक्रमाचे उदघाटक म्हणुन सुभाष सुरवसे तर कार्यक्रमाचे अध्यक्षा ग्रामसेविका सौ.शिंदे या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये गणेश पाटील, निता धाकपाडे,सय्यद नसिम,विजयमाले ठेंगे व रेखा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कौशल्य प्रशिक्षणात गोठा प्रकार , गोटा स्वछता , शेळीजात निवड ,तिची निगा राखने,मसाला बोलास कसा बनवणे ,वजन कसे घेणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन झाले.
तर दुसऱ्या दिवशी सोनपेठ चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भोसले यांनी प्राथमिक आरोग्यासाठी कोणती काळजी घ्यावी, पिलांचे वजन कसे वाढेल ,  लसीकरण कधी करावे याविषयी शेळीआरोग्य शिबीर सम्पन्न झाले.
विजयमला ठेंगे व पशुसखी यांच्या सहकार्याने यावेळी एकूण 29 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
या कौशल्य प्रशिक्षणाचा समारोप महिलांचे मनोगत घेऊन करन्यात आला.
एकंदरीतच तालुक्यातील बचतगटाच्या महिलांनसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होनार आसल्याने या उपक्रमाचे तालुक्यातुन कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment