तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

शुक्रवारी गुरु-चंद्र आणि मंगळाचा शुभ प्रभाव असूनही 12 पैकी 4 राशीच्या लोकांनी सांभाळून राहणे गरजेचे आहे. उत्तराभाद्रपद नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे काही लोक चिंताग्रस्त राहतील. या राशीच्या लोकांची कामे अपूर्ण राहू शकतात. पैसा अडकू सह्कतो. इतर आठ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष - नोकरीच्या ठीकाणी निर्माण झालेले अटीतटीचे प्रसंग समर्थपणे हाताळाल. वरीष्ठांशी व्यर्थ वाद घालू नका. घरात वृध्द मंडळी आपलेच खरे करतील. शुभ रंग : चंदेरी, अंक-१.

वृषभ - आज घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. मुलामुलींच्या बाबतीत एखादी चांगली घटना घडेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा. शुभ रंग : क्रिम, अंक-३.

मिथुन - हाताखालच्या व्यक्तींवर तुमचा वचक राहील. प्रामाणिक मेहनत व सकारात्मकतेने अशक्य कामेही शक्य होतील. आज महत्वाची कामे उरकूनच टाका. शुभ रंग :मोतिया, अंक-४.

कर्क - आज तुम्ही अगदी उत्साही व आशावादी असाल. कामानिमित्त दूरचे प्रवास होतील. अधिकारांचा गैरवापर नको. दैव आज तुमच्याच बाजूने आहे. शुभ रंग : राखाडी, अंक-६.

सिंह - आज काही मनाविरुद्ध घटना घडतील. नोकरदारांनी विरोधकांच्या कारवाया दुर्लक्षित करू नयेत. विवाह विषयक बोलणी उद्यावर ढकला. शुभ रंग : राखाडी, अंक-७.

कन्या - गृहिणींना काटासर कर गरज नाही. जमेची बाजू वेळीच साथ देईल. प्रिय पाहुण्यांची उठबस मात्र करावी लागेल. जोडीदाराकडून अपेक्षा पूर्ण होतील शुभ रंग : राखाडी, अंक-७.

तूळ - घाईगर्दीत निर्णय घेऊ नका. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी आलेली संधी सोडू नये. दानधर्म नको, आज आपलं कसं भागतय तेवढच बघा. शुभ रंग : तांबडा, अंक-४.

वृश्चिक - आज प्रॉपर्टीच्या व्यवहारात फायदा होईल. नोकरीत साहेबांच्या हो ला हो करुन वेळ मारुन न्या. सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरणार आहेत. शुभ रंग : भगवा, अंक-९.

धनू - व्यवसायात धाडस करताना अनुभवींचा सल्ला घ्या. आज जागेचे प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. मातोश्रींकडून लाभ संभवतो. छान दिवस. शुभ रंग : पांढरा, अंक-५.

मकर - जास्त वेळ घराबाहेर जाईल. नोकरीच्या ठिकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील. मित्रांच्या अश्वासनांवर विसंबून राहू नका. स्वावलंबन महत्वाचे. शुभ रंग : मोरपंखी, अंक-८.

कुंभ - हाती घेतलेली कामे विना व्यत्यय पूर्ण होतील. इच्छूकांचे विवाह जुळतील. स्वत:चे छंद जोपासाल. यशदायी दिवस. दैवाचे पाठबळ उत्तम. शुभ रंग : सोनेरी, अंक-५.

मीन - कौटुंबिक वातावरण आनंदी असून आज जोडीदार खुष असेल. व्यवसायातील ध्येय सहज गाठता येईल. आज मनोरंजनासही प्राधान्य द्याल. शुभ रंग : मोरपंखी, अंक-२.

No comments:

Post a Comment