Breaking News
Loading...

Monday, 11 September 2017

सारस्वत बँकेचे क्रेडिट कार्ड येणार, गुरुवारी शतकमहोत्सवी वर्षारंभ सोहळा


सारस्वत बँक आता क्रेडिट कार्ड आणि प्रीप्रेड कार्ड बाजारात आणणार आहे. बँकेने यंदा शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर रोजी शीव येथील षण्मुखानंद हॉलमध्ये भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात क्रेडिट कार्डचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर यांनी दिली.

सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग,भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे उपस्थित राहणार आहेत.

येत्या वर्षात नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनच्या टोल नाक्यांवरील स्वयंचलित वजावटीतही सारस्वत बँक यापुढे आपल्या फास्ट टॅग या उत्पादनाद्वारे सहभागी होणार आहे. तसेच भारत क्युआर-स्कॅन ऍण्ड पे ही सुविधाही सारस्वत बँकेच्या डेबिट कार्डद्वारे वापरता येणार आहे..

बँकांना तसेच क्रेडिट सोसायट्यांना बँकिंगविषयी प्रशिक्षण देण्याविषयीची सुविधा आणखी वाढवण्यात येणार असून प्रशिक्षण केंद्रासाठी सर्व सोयींनी युक्त इमारतही बांधण्याचा बँकेचा विचार आहे...

No comments:

Post a Comment