तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 16 September 2017

देशातील छोट्या आणि मोठ्या अशा ५१ वृत्तपत्रांच्या जाहिराती दोन महिन्यांसाठी बंद

तर या ५१ वृत्तपत्रांत ‘लोकमत’च्या कोणत्याही आवृत्तीचा समावेश नाही.

नवी दिल्ली : केंद्र सरकारचा प्रसिद्धी विभाग असलेल्या डीएव्हीपीने (डायरेक्टोरेट आॅफ अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड व्हिज्युअल पब्लिसिटी) देशातील छोट्या आणि मोठ्या अशा ५१ वृत्तपत्रांच्या जाहिराती दोन महिन्यांसाठी बंद करण्याचे ठरविले आहे.

प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आला. या ५१ वृत्तपत्रांत ‘लोकमत’च्या कोणत्याही आवृत्तीचा समावेश नाही. म्हणजेच ‘लोकमत’ने आपला दर्जा आणि वृत्तान्तातील तटस्थता कायम राखण्यात यश मिळवले आहे..

बहुतांश वृत्तपत्रांवरील ही बंदी पेड न्यूज छापल्याबद्दल असून, १३ सप्टेंबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत कोणतीही सरकारी जाहिरात या ५१ वृत्तपत्रांत प्रकाशित होणार नाही. डीएव्हीपीने ज्या ५१ वृत्तपत्रांची यादी जाहीर केली आहे त्यात दिल्लीहून प्रकाशित होणारे दैनिक जागरण, आज समाज, पुण्याहून प्रकाशित होणारा महाराष्ट्र टाइम्स, भुवनेश्वरचा द टाइम्स आॅफ इंडिया, मदुराईचे दिनकरन, रायपूरचे हरी भूमी, भोपाळचे राज एक्स्प्रेस आदी प्रमुख वृत्तपत्रांचा समावेश आहे.

सांगड स्थानिक नोक-यांशी

एकूण ५१पैकी ३७ वृत्तपत्रे पेड न्यूजबाबत दोषी आढळली आहेत. काही वृत्तपत्रांना बेजबाबदार बातम्या छापल्याबद्दल दोषी धरण्यात आले आहे. डीएव्हीपीच्या या निर्णयामुळे दबदबा असलेली वृत्तपत्रे चिंतित आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे येते दोन महिने सणावारांचे असून, त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात सरकारी जाहिराती प्रसिद्ध होतात. परंतु प्रिंट मीडिया जाहिराती धोरण (सन २०१६चे कलम २५)अंतर्गत वृत्तपत्रांना सरकारी वा कोणत्याही सरकारी संस्था यांच्या जाहिराती दिल्या जाणार नाहीत...

No comments:

Post a Comment