तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Wednesday, 13 September 2017

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

आद्रा नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे गुरुवारी कान आणि व्यतिपात नावाचे दोन अशुभ योग जुळून येत आहेत. यामुळे नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना नुकसान होऊ शकते. एखादाच महत्तवाचे काम अपूर्ण राहू शकते. खर्च होण्याची शक्यता आहे. मतभेद, वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष - कोणतेही काम तब्येतीला जपून करा. रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. आज महत्वाच्या कामासाठी अनपेक्षित प्रवास घडण्याची शक्यता आहे. शुभ रंग : राखाडी, अंक-८.

वृषभ - पैशा अभावी रखडलेल्या कामांना गती येईल. आज मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळवता येईल. स्वच्छंदीपणे वागाल. शुभ रंग : पिवळा, अंक-७.

मिथुन - उद्योग धंद्यात नवे उपक्रम यशस्वीपणे राबवाल. एखाद्या समारंभात तुमची उपस्थिती महत्वाची राहील. गृहीणी आवडत्या कामात स्वत:ला झोकून देतील. शुभ रंग : भगवा, अंक-९.

कर्क - काही मनस्ताप देणाऱ्या घटना घडतील. उद्योग धंद्यातील मंदीने बेचैनी जाणवेल. प्रवासात आज मागच्या खिशात पैसे ठेऊ नका. तब्येत संभाळा. शुभ रंग : डाळिंबी, अंक-२.

सिंह - स्वार्थ व परमार्थ यांचा योग्य समन्वय साधाल. यशाचा मार्ग सोपा होईल. ध्येयप्राप्तीच्या दिशेने आगेकूच कराल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्त होईल. शुभ रंग:केशरी, अंक-६.

कन्या - नोकरीत बिनचूक कामास प्राधान्य देणे हिताचे. हितशत्रू संधी शोधत असताना गाफील राहून चालणार नाही. आज अधिकाऱ्यांचा वचक जाणवेल. शुभ रंग : मोरपंखी, अंक-८.

तूळ - नोकरीत वरीष्ठांचा मूड सांभाळावा लागेल. कायद्याचे तंतोतंत पालन करणे हिताचे राहील. ज्येष्ठांना आज उपासनेतून प्रसन्नता लाभेल. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-५.

वृश्चिक - एखाद्या कामासाठी फिरावे लागेल. थकवा जाणवेल. आवक जावक सेम सेमच राहील. काही मोफत सल्लागार मंडळींचे सल्ले फार मनावर घेऊ नका. शुभ रंग : नारिंगी, अंक-१.

धनू - तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. काही प्रतिष्ठित मंडळी संपर्कात येतील. किचकट प्रश्न सामोपचाराने मिटवता येतील. जोडीदाराची उत्तम साथ राहील. शुभ रंग : पिस्ता, अंक-४.

मकर - बेरोजगारांना रोजगाराच्या संधी येतील. काही येणी वसूल झाल्याने आर्थिक तणाव कमी होईल. वादविवादात आपले मत मांडण्याची घाई करु नका. शुभ रंग :पांढरा, अंक-९

कुंभ - आज नव्या जबाबदाऱ्या, नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. आज आवक समाधानकारक असल्याने उच्च राहणीमानाकडे तुमचा कल राहील. शुभ रंग : निळा, अंक-३.

मीन - एखादी घरगुती समस्या सोडवण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांच्या मागण्या पुरवाव्या लागतील. प्रेमप्रकरणांतून डोक्याला तापच होईल. शुभ रंग : मोतिया, अंक-३.

No comments:

Post a Comment