Breaking News
Loading...

Saturday, 9 September 2017

मालेगांव ते सेनगांव मार्गे एस.टी.बस सुरु करण्यासाठी ग्रा.पं.ने घेतला ठराव आजेगांव चे उपसरपंच देविदास अण्णा वाघ यांचा पुढाकार

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:-तालुक्यातील आजेगांव हे गांव दहा हजार लाेकवस्ती असणारे जिल्हा परीषद सर्कलचे सेनगांव तालुक्याच्या मध्यभागी असलेले महत्वाचे केंद्रबिंदु म्हणुन संबाेधले जाते.विदर्भापासुन हे गांव काेयाळी मार्गे फक्त १५ कि.मी.आहे.अनेक शासकीय कर्मचारी व व्यापारी वाशिम येथुन सेनगांव तालुक्यात येण्यासाठी काेयाळी मार्गे शाँटकटचा अवलंब करतात. आता काेयाळी ते मन्नास प्रिंप्री हा रस्ता डांबरीकरणाने जाेडल्या  गेल्याने मालेगांव मार्गे काेयाळी पर्यंत एस.टी.बस ही सेनगांव पर्यंत  आजेगांव मार्गे साेडण्यात यावी. यामुळे मन्नास प्रिंप्री,बटवाडी,केंद्रा (खु),केंद्रा (बु.), ताकताेडा,कहाकर,हाताळा, वरखेडा,आजेगांव,वाघजाळी,धनगरवाडी,शिंदेफळ,शिवणी (खु), शिवणी (बु), कारेगांव,सिनगी (नागा), सुकळी आदी गांवाच्या प्रवाशाना या एस.टी.बसमुळे सुविधा हाेणार असल्याने या मार्गावर एस.टी.बस सुरु करण्यासाठी आजेगांव चे उपसरपंच देविदास अण्णा वाघ यांनी पुढाकार घेऊन आजेगांव ग्रामपंचायत बैठकीत ठराव पारीत केला आहे.या ठरावाला अनुमाेदन शिवाजी वाघ यांनी दिले. यावेळी सरपंच चाटसे, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित हाेते.

No comments:

Post a Comment