तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 10 September 2017

सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा परिसरातील शेंगाच नसलेल्या सोयाबीनची पाहणी करण्यात आली

  

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगाव:-  तालुक्यातील हिवरखेडा परिसरातील सोयाबीन पिकाला अद्याप हि शेंगा लागल्या नाहीत या शेतं शिवराची पाहणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अधिकार्यांनी पाहणी केली या वेळी डॉ.एस.पी.मेहेत्रे.सोयाबीन पैदासकर डॉ.यु.एन.आळसे.डॉ.इ लीयस किटकनाशक शास्त्रज्ञ.प्रा.ए.टी.दौंडे.वनस्पती निकृती शास्त्रज्ञ. आर बि हरणे तालुका कृषी अधिकारी, कृषीपर्यवेशक  पानपट्टे साहेब.कृषीपर्यवेशक सूर्यवंशी साहेब या टीम ने शेतं शिवरात पाहणी केली दत्तराव कुंडलिक निरगुडे यांच्या गट नं (१८७)या शेतात जाऊन सोयाबीन पीकाची केली या परिसरातील शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केली पण पावसाने एक महीना पाठ फिरवल्याने सोयाबीन ला शेंगाच लागल्या नाहीत यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे या परिसरातील शेतकऱ्यांनी महागडी किटकनाशक वापरली तरी पण शेंगाच लागल्या नाहीत शेतकऱ्यांनी काय करावे आणि कसे जगावे हा प्रश्न त्याना सतावत आहे संपूर्ण गावातील शेतं शिवरात या वर्षी सोयाबीन चा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे या परिसरातिल शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे प्रशासनाने त्वरित या भागातील पंचेनामे करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत. या परीसरासह हत्ता,खुडज,केंद्रा,आजेगांव,तळणी,सेनगांव,पुसेगांव,साखरा,कापडसिंगी,सालेगांव,बन बरडा,सापटगांव,उटी (ब्र.), कारेगांव आदीसह सेनगांव तालुक्यात साेयाबिनला शेंगा न लागल्याच्या तक्रारी तहसिल कार्यालयात निवेदनाव्दारे येत आहेत. या विषयी हिंगाेली जिल्हाधिकारी कार्यालयावर खा.राजीव सातव, आमदार संताेष टारफे, हिंगाेली जि.प. उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या नेतृत्वाखाली हिवरखेडा येथील शेतक-यांनी धरणे आदाेंलन केले हाेते.

No comments:

Post a Comment